महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

प्रेमीयुगुलांसाठी हा आठवडा ठरेल खास; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशी भविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 5:13 AM IST

  • मेष : संतोषातच परम सुख असते हे आपणास या आठवड्यात लक्षात ठेवावं लागेल. जीवनात जे काही परिश्रम आणि प्रयत्न करून प्राप्त झाले आहे ते काही कमी नाही. आठवड्याच्या पूर्वार्धात आपणास आपल्या प्रत्येक कार्यात मग तो व्यापार असो किंवा विद्यार्थी जीवन असो, त्यात थोडा धिमेपणा असल्याचं जाणवलं तरी सुद्धा प्रगती होताना दिसून येईल. महत्वाच्या कार्यात थोडा त्रास संभवतो. या आठवड्यात आपणास वाणी संयमित ठेवावी लागेल, अन्यथा होत असलेली कामे बिघडू शकतात. आठवड्याचा उत्तरार्ध आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याचं दिसत आहे. या दरम्यान एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी झालेली ओळख भविष्यात मोठ्या लाभास कारणीभूत ठरेल. प्रेम संबंधात गोडवा येईल. प्रेमिकेच्या सहवासात हसत खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. कुटुंबियांसह एखादा छोटासा प्रवास संभवतो. प्रकृती सामान्यच राहील.
  • वृषभ: या आठवड्यात आपणास आपल्या कारकिर्दी आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करावं लागेल. व्यक्तिगत जीवनात सतर्क राहावं लागेल. कोणताही निर्णय विचार पूर्वकच घ्यावा लागेल. आठवड्याच्या सुरूवातीस आपल्या जीवनात व्यस्तता राहील. आपले विरोधक आपल्या योजना आणि कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. या दरम्यान आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. तसेच लहान-सहान समस्या दुर्लक्षित करण्या ऐवजी त्यांचं निराकरण करा. व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी शुभचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नका. या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. आठवड्याच्या मध्यास थोडे प्रवास संभवतात. प्रेमसंबंध दृढ होण्यासाठी आपल्या प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराच्या प्रकृतीमुळं चिंतीत होतील.
  • मिथुन: या आठवड्याच्या सुरूवातीपासून आपणास जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांच्या समस्यांचं निराकरण करताना आपल्या स्वकीयांच्या भावना दुर्लक्षित करू नका. कारकीर्द असो किंवा व्यवसाय, या आठवड्यात योजनाबद्ध राहून कार्य करणं लाभदायी होऊ शकेल. अन्यथा आपली होत असलेली कामे सुद्धा स्थगित होण्याची संभावना आहे. व्यवसायात आपल्या कार्यक्षमतेनुसारच कार्य विस्तार करण्याचा विचार करावा. लोकांचे ऐकून कोणताही मोठा निर्णय घेण्याची चूक अजिबात करू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती आपल्या चिंतेस कारणीभूत होऊ शकते. या दरम्यान एखाद्या मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कठीण प्रसंगी आपली प्रेमिकाच आपली शक्ती होईल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. महिलांचा बहुतांश वेळ धार्मिक कार्यात जाईल.
  • कर्क : हा आठवडा आपल्यासाठी सौभाग्यदायी आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना रोजगाराची संधी मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं आपलं रोजगाराशी संबंधित स्वप्न साकार होईल. कोर्ट-कचेरीशी संबंधित बाबीत आपणास मोठा दिलासा मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यास धार्मिक-सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. या दरम्यान आपला मान-सन्मान, पद, प्रतिष्ठा यात वृद्धि होईल. या आठवड्याच्या उत्तरार्धात कामानिमित्त झालेले प्रवास लाभास कारणीभूत होतील. या दरम्यान एखाद्या प्रिय किंवा प्रतिष्ठित व्यक्तीची भेट सुद्धा संभवते. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी अनुकूल आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीस विवाहासाठी मागणी घातली, तर ती त्यास मान्यता देईल. ज्या व्यक्ती आधीपासूनच प्रेम संबंधात आहेत त्यांचे नाते अधिक दृढ होईल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील.
  • सिंह: या आठवड्यात कोणताही निर्णय क्रोधीत होऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका, अन्यथा निव्वळ धनहानीच नाही तर वर्षानुवर्षां पासूनच्या नात्यात सुद्धा कटुता निर्माण होऊ शकते. जर एखाद्या समस्येचं निराकरण करणं आपणास जमत नसेल तर एखाद्या शुभचिंतकाचा सल्ला घ्यावा. द्विधा मनःस्थिती असताना कोणताही निर्णय पुढे ढकलणं हितावह होईल. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध दिलासा देणारा आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठांची आपल्यावर मेहर नजर राहील. परदेशाशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना या आठवड्यात अपेक्षित लाभ होऊ शकतो. या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनास अचानकपणे एक नवीन आणि वेगळे वळण लागू शकते. कोणताही गैरसमज वाद न घालता संवादाने दूर करावा. वैवाहिक जीवन सुखद होईल. ऋतुजन्य आणि जुनाट आजारांपासून सावध राहा.
  • कन्या : या आठवड्यात आपणास कारकिर्दीत-व्यवसायात अपेक्षित प्रगती होत असल्याचं दिसू लागेल. धनलाभ उत्तम होणार आहे. याचबरोबर आपल्या संचित धनाची सुद्धा वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांचे प्राप्तीचे नवीन स्रोत निर्माण होतील. ह्या दरम्यान कोणत्याही वापरात नसलेल्या वस्तूंचा आपणास त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ आणि कनिष्ठ ह्यांच्या साथीनेच कामे करावी लागतील. मुलांशी संबंधित एखादी चिंता आपणास सतावू शकते. व्यक्तिगत जीवनात सुद्धा वैवाहिक जोडीदाराशी वाद किंवा भांडण होऊ शकते. प्रणयी जीवनात सावधपणे पाऊले टाकावीत. आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करणं टाळावे, अन्यथा सामाजिक कलंक लागण्याची संभावना आहे. आठवड्याच्या अखेरीस दूरवरचे प्रवास संभवतात. प्रवासात आपल्या प्रकृतीची आणि सामानाची काळजी घ्यावी. त्याचबरोबर वाहन चालवताना सावध राहावे.
  • तूळ : हा आठवडा आपल्यासाठी सुखदायी, सौभाग्यदायी आणि उन्नतीदायी होणार आहे. या आठवड्यात योजनाबद्ध कामे केल्यास यशस्वी होता येईल. कुटुंबात शुभ, मंगल, धार्मिक कार्य संपन्न होण्याची संभावना आहे. आर्थिक स्थितीत सामान्य झाली तरी सुधारणा नककीच होईल. कार्यक्षेत्री आवडते काम किंवा आवडत्या जागी बदली मिळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल. जमीन - जुमल्याशी संबंधित वाद संपुष्टात येऊन त्यांच्या खरेदी-विक्रीतून लाभ होईल. आपली हि इच्छा पूर्ण करण्यात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे किंवा मित्राचे विशेष सहकार्य प्राप्त होईल. दुकानदारी पेक्षा फुटकळ व्यापार करणाऱ्यांना जास्त लाभ होईल. असं असलं तरी व्यापारात योजनाबद्ध कार्य केल्यास लाभ होण्याची संभावना वाढेल. प्रेम संबंधात प्रगल्भता येईल. आपसातील विश्वास वाढेल. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्यानं घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. प्रकृती सामान्यच राहील.
  • वृश्चिक: या आठवड्यात आपलं मन, आपलं कार्य आणि त्यात होणाऱ्या प्रगतीनं जर बेचैन झाला असेल तर आपणास धीरानं आणि विचारपूर्वक एखादे मोठे पाऊल उचलावे लागेल. कार्यक्षेत्री विरोधकांच्या षडयंत्रा पासून सतर्क राहावे. ह्या आठवड्यात दीर्घ किंवा लहान पल्ल्याचा प्रवास संभवतो. व्यवसायात धन लाभ झाला तरी खर्च सुद्धा वाढतील. अर्थात खर्च सुद्धा चांगल्या कामासाठीच होईल. व्यापार वृद्धीच्या निमित्ताने नवीन लोकांशी झालेली ओळख फायदेशीर होईल. ह्या आठवड्यात प्रणयी जीवनात काहीसे वादळ निर्माण होऊ शकते. प्रेमिकेशी झालेला गैरसमज आपल्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतो. कोणत्याही संशयास्पद स्थितीपासून दूर न राहिल्यास अचानक तणाव वाढू शकतो. दांपत्य जीवनात लटके वाद होऊन सुद्धा माधुर्य टिकून राहील.
  • धनु : या आठवड्याच्या सुरवातीस प्रवासातून निव्वळ धन लाभच होणार नाही तर प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख सुद्धा होईल. त्यांच्या मदतीने भविष्यात लाभदायी योजना बनू शकेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. कार्यक्षेत्री वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय वृद्धी करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावे आणि त्या संबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला जरूर घ्यावा. आठवड्याच्या मध्यास एखाद्या धार्मिक-सामाजिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. ह्या दरम्यान आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. कुटुंबीय किंवा मित्रांसह एखादी तीर्थयात्रा करण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात जमीन-जुमल्याची खरेदी-विक्री करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रेम संबंध अजून दृढ होतील. दांपत्य जीवन सुखद होईल.
  • मकर : या आठवड्याच्या सुरवातीस धार्मिक-सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबियांसह एखादा प्रवास सुद्धा संभवतो. ह्या दरम्यान आपली प्रकृती चांगली राहील. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आपण सुदृढ असल्याचं आपणास जाणवेल. थकबाकी मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल. मात्र, ह्या आठवड्यात अशा कोणत्याही योजनेत कि ज्यात जोखीम असल्याची शंका असेल त्यात पैसे गुंतवण्याचे धाडस करू नका. नोकरी करणाऱ्यांना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत मिळतील. धन-संपत्तीत वाढ होईल. एखाद्या वरिष्ठ किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीनं जमीन - जुमल्याशी संबंधित वादाचे निराकरण होईल. प्रणयी जीवनात एकमेकांवर विश्वास ठेवा. कोणत्याही प्रकारे आपल्या प्रेमिकेच्या भावना दुर्लक्षित करू नका. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. कोणत्याही कठीण प्रसंगात आपला वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी सावली प्रमाणे ठाम उभा राहील.
  • कुंभ: या आठवड्यात कार्यक्षेत्री आपणास वरिष्ठ आणि कनिष्ठ ह्यांचे विशेष सहकार्य लाभेल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना रोजगार मिळेल. आपण जर एखादा व्यवसाय करत असाल तर आपणास अपेक्षित लाभ होऊन व्यवसाय वृद्धी सुद्धा होईल. कामा निमित्त केलेले प्रवास लाभदायी ठरतील. राजकारणी व्यक्तींना एखादे पद किंवा जवाबदारी मिळू शकते. एकंदरीत परिश्रम व प्रयत्नांचे पूर्ण फळ ह्या आठवड्यात आपणास मिळणार आहे. परीक्षा-स्पर्धा ह्यांची तयारी करत असणाऱ्यांना एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. घरी प्रिय व्यक्तीचे आगमन होईल. ह्या दरम्यान एखाद्या सहलीचे आयोजन होऊ शकते. प्रेम संबंध दृढ होतील. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. पूर्वीपासून चालत आलेल्या आरोग्य विषयक तक्रारी कमी होतील.
  • मीन: या आठवड्यात कामानिमित्त आपणास सारखे प्रवास करावे लागण्याची संभावना आहे. कुटुंबाशी संबंधित समस्यांमुळे मन चिंतीत होईल. जमीन-जुमला किंवा पैतृक संपत्तीशी संबंधित वादांमुळे आपणास कोर्ट-कचेरी करावी लागू शकते. परंतु, कोर्टाच्या बाहेर आपसात बोलणी करून वाद संपुष्टात आणणे हितावह होईल. कार्यक्षेत्री आपले विरोधक सक्रिय होतील. अशा परिस्थितीत लहान-सहान गोष्टींना थारा न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. कार्यक्षेत्री सर्वांशी समन्वय साधणे हितावह होईल. आपण जर व्यवसाय करत असाल तर कोणत्याही योजनेत विचारपूर्वकच आर्थिक गुंतवणूक करावी. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रणयी जीवन असो किंवा कौटुंबिक जीवन, त्यात गैरसमज दूर करण्यासाठी वाद घालण्या ऐवजी संवाद साधावा. कोणत्याही परिस्थितीत स्वजनांच्या भावनांकडं दुर्लक्ष करू नका, अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details