मेष (ARIES) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळं महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्यानं आज कोणताही निर्णय न घेणं हितावह राहील. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. लेखनकार्य करण्यास दिवस अनुकूल आहे. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमय होईल. कोणत्याही स्त्रीशी वाद घालू नका.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज चंचल मनःस्थितीमुळं हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. लेखक, कलाकार तथा सल्लागार ह्यांच्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवे काम आरंभ करण्यात अडचणी येतील.
मिथुन (GEMINI) :आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. स्वादिष्ट आणि रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र आणि कुटुंबीय यांच्या सहवासामुळं मानसिकदृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. प्रकृती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ न देणे हितावह राहील.
कर्क (CANCER): आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळं कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात.वाणीवर संयम ठेवावा लागेल. मनातील साशंकता दूर करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
सिंह (LEO) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रीया आणि मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्यस्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळं हाती आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह राहील. विचार करण्यात खूप वेळ जाईल. आर्थिक लाभ संभवतात.
कन्या (VIRGO) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी,नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ संभवतात. घरात आनंदी वातावरण राहील.
तूळ (LIBRA) : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य व बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र आणि नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य राहील.