मेष (ARIES) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात आपण कौतुकास पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. बोलण्यावर संयम राखणं आवश्यक आहे. वैचारिकदृष्टया उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ (TAURUS) :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. बोलण्याच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल आणि मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानानं फळ मात्र कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज आपल्या मनात विविध विचार योतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आईविषयी हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. प्रवाही पदार्थांपासून सावध राहावं लागेल. मानसिक ताण राहील.
कर्क (CANCER) :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील. पैसा खर्च होईल आणि कामात अपयश येईल. जेवन अवेळी होईल. निद्रानाशाचा त्रास होईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.
सिंह (LEO) : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचं सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधांमधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचं ठरवाल. मानसिकदृष्टया चिंतामुक्त व्हाल. कार्य यशस्वी होईल.
कन्या (VIRGO) :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. गोड बोलण्यानं आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट जेवनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना मात्र आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.
तूळ (LIBRA) :चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज आपण आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळं हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनावर पैसा खर्च होईल.