मेष (ARIES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात आहे. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीनं विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपारनंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. आज गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल. कौटुंबिक विरोध संभवतो. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच अडकून पडण्याची शक्यता आहे. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन चालवताना काळजी घ्यावी.
वृषभ (TAURUS): चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात आहे. आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख-समाधान लाभेल. व्यापार-व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचं कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील. दुपारनंतर नवीन कामाचं यशस्वी नियोजन करू शकाल. व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्यानं आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपारनंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्यानं मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल. वडीलधार्यांच्या आशीर्वादानं तुमचे कार्य तडीला जाईल. नोकरीत बढती संभवते. धन मिळेल.
कर्क (CANCER) :चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात आहे. आज मन अशांत आणि निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. अवैध कृत्ये आणि नकारात्मक विचारापासून दूर राहावं लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपारनंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्यानं मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्याशी वाद आणि मतभेद होण्याची शक्यता आहे.
सिंह (LEO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात आहे. आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपारनंतर मात्र अती विचार केल्यामुळं मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळं कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल. पैशाची चणचण भासेल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्यानं खुश राहाल. यश आणि प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळं शारीरिक, मानसिकदृष्टया आपण तरतरीत आणि प्रफुल्लित राहाल. भावनेच्या भरात आपण वाहवत जाण्याची शक्यता आहे. दुपारनंतर दिवस आनंदात जाईल. व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील.
तूळ (LIBRA) :चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात आहे. लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.