मेष (ARIES) :आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद-विवादापासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी अशांतात टाळू शकाल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या नाहीतर आरोग्य बिघडवू शकते. जेवण वेळेवर घेता येणार नाही. विनाकारण खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणा दाखविणे तुम्हाला फायदेशीर राहील. आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य आहे.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज आपण शरीर आणि मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलेचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. आज नवे कपडे, दागिने ह्यांची खरेदी झाल्यानं दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासात वृद्धी होईल.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज बोलताना आणि व्यवहारात सावध राहावं लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडं लक्ष द्यावं लागेल. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील. एखादा अपघात संभवतो. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.
कर्क (CANCER) :आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी, व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांसह प्रवासाला जाऊ शकाल. प्रिय व्यक्तीसह वेळ चांगला जाईल. आर्थिक योजना यशस्वी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शरीर आणि मन स्वस्थ राहील.
सिंह (LEO) :आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे हे टाळा. वडिलांशी मतभेद होतील. शुभ कार्य ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
कन्या (VIRGO) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. मुलांनबरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. एखादे मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यासाठी पैसा खर्च होईल. भावंडां कडून लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ (LIBRA) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टम भावात असेल. आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे यामुळं वाद होतील. रागावर संयम ठेवणं आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा होणारा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्यानं पाण्यापासून दूर राहणं हिताचं राहील.