मेष (ARIES) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ उत्साहानं होईल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्रांची भेट होईल. दुपार नंतर कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी. कुटुंब, आप्तेष्ट आणि कामाच्या ठिकाणी संबंधातील सौहार्दता टिकून राहण्यासाठी स्फूर्ती आणि उत्साह ह्यात संतुलन ठेवावं लागेल.
वृषभ (TAURUS): चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. द्विधा मनःस्थितीमुळं आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे आणि सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपारनंतर थोडे सावध राहावं लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत.
कर्क (CANCER) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आज कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्यानं प्रकृतीवर परिणाम होईल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रासह एखाद्या सहलीचं नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.
सिंह (LEO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. दिवसाची सुरूवात शारीरिक, मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापानं इतरांची मने दुखवाल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणीवर संयम ठेवा. प्रकृती नरम गरमच राहील. दुपारनंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. विद्येची आवड निर्माण होईल.
तूळ (LIBRA) : चंद्र आज मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासानं आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपारनंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शक्यतो प्रवास टाळावेत.