मेष (ARIES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचं यशस्वी नियोजन करू शकाल. दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता होणार नाही. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. स्वकीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल.
वृषभ (TAURUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचं योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतात. एखाद्या रमणीय स्थळी सहलीचं आयोजन करू शकाल.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगलं राहील. मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं असेल. दुपारनंतर शारीरिक, मानसिकदृष्टया अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनप्राप्ती संभवते. कुटुंबात सुख शांती नांदेल.
कर्क (CANCER) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज अवैध आणि निषेधार्ह विचारापासून दूर राहणं हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्यानं शारीरिक, मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपारनंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संततीविषयक चिंता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी झालेल्या वादामुळं आपल्या मनाला दुःख होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणं हितावह राहील.
सिंह (LEO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आरोग्याच्या दृष्टीनं आज आपण प्रसन्न आणि आनंदित राहाल. मित्र आणि संबंधितांसह हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. दुपारनंतर मानसिक नैराश्य जाणवेल. संतापाची भावना वाढेल. कुटुंबात वादविवाद होऊ नयेत ह्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढल्यानं आर्थिक चणचण भासेल. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावं लागेल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्यानं चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश आणि कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक, मानसिकदृष्टया प्रसन्नता जाणवेल. घरात सुखशांती नांदेल. प्रत्येक कामातून दृढ मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. एखादा प्रवास संभवतो.
तूळ (LIBRA) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्यानं मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता आहे. दुपारनंतर कामे यशस्वी झाल्यानं मानसिक प्रसन्नता लाभेल. आज यश आणि कीर्ती प्राप्त होईल. व्यवसायात चांगले सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.