हैदराबाद Somwati Amavasya 2024 -ज्योतिष आचार्य पंडित सुशील शुक्ला शास्त्री यांच्या माहितीनुसार शिव पुजेचे सोमवती अमावस्येला खास महत्त्व आहे. या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. पितृांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्या महत्त्वाची मानली जाते.
शास्त्राच्या माहितीनुसार सोमवती अमावस्येला महिला व्रत करतात. शिव आणि पार्वतीची पूजा करतात. सोमवती अमावस्येला पूजा आणि व्रत करणाऱ्या महिलांच्या पतीला दीर्घायुष्य मिळते. सोमवती अमावस्येला संपूर्ण दिवस व्रत करणाऱ्या महिलांना अखंड सौभाग्य मिळते. पितृांचा आशिर्वाद मिळतो. ज्योतिष आचार्य पंडित सुशील शुक्ला शास्त्री म्हणाले, जर शिवलिंगाला दूध आणि गंगाजलाचा अभिषेक केला तर पितृ दोष, कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. पितृांच्या आत्म्याला शांती मिळते.
कधी आहे मुहूर्त?सोमवती अमावस्येला पूजा करण्यासाठी सकाळी सुर्योदयापूर्वी उठा. ब्राम्हमुहूर्तावर स्नान करा. सुर्याला अर्घ्य देऊन पूजा करा. व्रत करण्याचा संकल्प घेऊन शिव आणि पार्वतीची विधिवत पूजा करा. पिंपळाला १०८ प्रदक्षिणा घाला. सायंकाळी पिंपळाच्या खाली दिवा प्रज्वलित करा. त्यामुळे शंकर-पार्वती आणि शनि देव प्रसन्न होतात. पंडित रमेश शर्मा यांच्या माहितीनुसार आजची सोमवती अमावस्या चालू वर्षातील पहिली सोमवती अमावस्या आहे. ही अमावस्या ८ एप्रिलला पहाटे तीन वाजून ११ मिनिटाला सुरू होते. तर रात्री ११ वाजून ५० मिनिटाला संपते. दान करण्यासाठी पहाटे ४ वाजून ५५ मिनिटे ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्ताला करण्यात आलेले दान आणि स्नान याचे चांगले फळ मिळते.