मुंबई Shree Ram Pran Pratishtha at Home : प्रभू श्रीरामाची 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. देशातील रामभक्तांसाठी हा ऐतिहासिक दिवस असणार आहे. देशभरातील अनेक रामभक्त या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. तर देशभरातील अनेक रामभक्त घरुनच ऑनलाईन लाईव्ह सोहळा पाहणार आहेत. अनेकजण या दिवशी आपल्या घरात प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापन करणार आहेत. जर तुम्ही अयोध्येला जाऊ शकत नसाल, तर तुम्ही घरी कोणत्या पद्धतीनं रामाची पूजा करू शकता? जाणून घ्या सविस्तर....
पूजेसाठी लागणारं साहित्य : श्री रामाचा फोटो किंवा मुर्ती, फूल, नारळ, सुपारी, फळं, लवंग, धूप, दिवा, तूप, पंचामृत, अखंड, तुळशीचे पानं, चंदन, मिष्टान्न आदी साहित्य या पुजेसाठी लागणार आहे.
अशा प्रकारे करा घरी रामाची पूजा : सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ व नवीन कपडे घाला, ज्या ठिकाणी प्रभू रामाची मुर्ती, फोटो किंवा राम दरबार ठेवला आहे, ती जागा गंगाजलानं शुद्ध करा, आता त्या ठिकाणी एक लाकडी चौरंग ठेवून त्यावर लाल कपडा पसरवून रामाची मूर्ती स्थापित करावी. राम दरबार किंवा प्रभू रामाच्या फोटोसोबत कलशाचीही स्थापना करावी. तसेच कलशाची देखील पूजा करावी.
अक्षतांनी रामाची पूजा सुरू करा :प्रभू रामाच्या चरणकमळांनी पूजेची सुरुवात करा, त्यांना दूध, दही, तूप, गंगाजल आणि मध अर्पण करावे. राम दरबाराला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. आता फुले, रोळी आणि अक्षतांनी रामाची पूजा सुरू करावी. यानंतर हनुमान चालीसा पाठ करावा. शेवटी तुपाचा दिवा आणि कापूर लावून प्रभू रामाची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा.