महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

शारदीय नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व; पहिल्या दिवशी देवीला परिधान करा 'या' रंगाची साडी - Navratri 2024 Colours - NAVRATRI 2024 COLOURS

Navratri 2024 Colours : हिंदू धर्मात नवरात्रीला खुप महत्व आहे. यंदा 3 ऑक्टोबरपासून 'शारदीय नवरात्री' उत्सवाला (Shardiya Navratri 2024) सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. देवीची नऊ रूपं नऊ रंगांचं प्रतिनिधित्व करतात असं मानलं जातं. प्रत्येक रंगाचं स्वतःचं महत्त्व आहे. चला तर पाहूया कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत.

Navratri 9 Colours 2024
नवरात्रीचे नऊ रंग 2024 (Etv Bharat GFX)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 2:47 PM IST

Updated : Sep 30, 2024, 4:24 PM IST

हैदराबाद Navratri 2024 Colours: 3 ऑक्टोबर 2024 घटस्थापना केल्यानंतर 'शारदीय नवरात्री' उत्सवाला (Shardiya Navratri 2024) सुरुवात होणार आहे. तर शनिवार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी आहे. याच दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दररोज वेगवेगळे रंग जोडले जातात.

घटस्थापना मुहूर्त (Ghatasthapana Muhurta 2024) :नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे.

नवरात्रीचे नऊ रंग (ETV Bharat GFX)

नवरात्रीचे नऊ रंग - (Navratri 9 Colours List)

  • पहिला दिवस, 3 ऑक्टोबर, गुरुवारपिवळा रंग (पिवळ्या रंग उष्णतेचं प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो.)
  • दुसरा दिवस,4 ऑक्टोबर, शुक्रवार – हिरवा रंग (हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे. हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो.)
  • तिसरा दिवस,5 ऑक्टोबर, शनिवार – राखाडी रंग (राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधे होण्यासाठी प्रेरित करतो.)
  • चौथा दिवस, 6 ऑक्टोबर, रविवार – केशरी रंग (केशरी रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो.)
  • पाचवा दिवस, 7 ऑक्टोबर, सोमवार –पांढरा रंग(पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे.पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो.)
  • सहावा दिवस,8 ऑक्टोबर, मंगळवार– लाल रंग (लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे.)
  • सातवा दिवस, 9 ऑक्टोबर, बुधवारनिळा रंग ( हा रंगाचा वापर केल्यानं अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो.)
  • आठवा दिवस,10 ऑक्टोबर, गुरुवार – गुलाबी रंग (गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो.)
  • नववा दिवस,11 ऑक्टोबर, शुक्रवार – जांभळा रंग(जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.)

टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.

हेही वाचा -

  1. शारदीय नवरात्रीत 'अशी' करा घरात घटस्थापना; जाणून घ्या, शुभ मुहूर्त आणि साहित्य - Navratri 2024
  2. शारदीय नवरात्रीत करा 'या' नऊ देवीची आराधना; मनोकामना होतील पूर्ण - Shardiya Navratri 2024
  3. शारदीय नवरात्री 2024; यंदा पालखीत येणार दुर्गा माता, मानवी जीवनावर होणार परिणाम - Durga Devi Vahan 2024
Last Updated : Sep 30, 2024, 4:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details