मेष (ARIES) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद-विवादापासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी अशांतात टाळू शकाल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या नाहीतर आरोग्य बिघडवू शकते. जेवण वेळेवर घेता येणार नाही. विनाकारण खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणा दाखविणे तुम्हाला फायदेशीर राहील. आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य आहे.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज आपण शरीर आणि मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलेचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. आज नवे कपडे, दागिने ह्यांची खरेदी झाल्यानं दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासात वृद्धी होईल.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज बोलताना आणि व्यवहारात सावध राहावं लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडं लक्ष द्यावं लागेल. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील. एखादा अपघात संभवतो. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.
कर्क (CANCER) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी, व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांसह प्रवासाला जाऊ शकाल. प्रिय व्यक्तीसह वेळ चांगला जाईल. आर्थिक योजना यशस्वी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शरीर आणि मन स्वस्थ राहील.
सिंह (LEO) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे हे टाळा. वडिलांशी मतभेद होतील. शुभ कार्य ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
कन्या (VIRGO) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. मुलांनबरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. एखादे मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यासाठी पैसा खर्च होईल. भावंडां कडून लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ (LIBRA) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टम भावात असेल. आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे यामुळं वाद होतील. रागावर संयम ठेवणं आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा होणारा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्यानं पाण्यापासून दूर राहणं हिताचं राहील.
वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. आपण आनंदी राहाल. संपत्ती वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचं वातावरण राहील. नोकर आणि सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात यश मिळेल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. मैत्रीणींची भेट होईल.
मकर (CAPRICORN) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज कला आणि साहित्य क्षेत्रात असणार्या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगिरी करतील. प्रेमिकांना प्रेमाचा अनुभव येईल. शेअर-सट्टा यात लाभ होईल. संततीच्या समस्या मिटतील. मित्रांकडून लाभ होईल.
कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचं नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य-प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल. स्वभावात हट्टीपणा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.
मीन (PISCES) : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळं कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. मित्रांसह लहानसा प्रवास कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
हेही वाचा -
यंदा मकर संक्रांत कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि काळ्या रंगाचं महत्त्व