मेष (ARIES) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याचबरोबर सुखद प्रवासाचा आनंद आणि रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार आणि अती उत्साहाला आवर घालावा लागेल. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश आणि लाभ मिळेल. आज शक्यतो बौद्धिक चर्चा करताना वाद टाळून समाधानी वृत्तीचा स्वीकार करणे उचित ठरेल.
वृषभ (TAURUS) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल आणि योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्टया आनंदात राहाल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन (GEMINI) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आज संतती आणि वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद-विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळं खर्च आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. पोटाच्या व्याधींमुळं त्रस्त व्हाल. नवीन कार्यारंभ आणि प्रवास शक्यतो टाळा.
कर्क (CANCER) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज सांभाळून राहावं लागेल. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावं लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांचा त्रास संभवतो. कुटुंबियांशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्यानं सुद्धा मन दुःखी होईल. पैसा मोठया प्रमाणावर खर्च होईल. सामाजिक मानहानी संभवते. निद्रानाशाचा त्रास होण्याची शक्यता आहे.
सिंह (LEO) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज शरीर आणि मन स्वस्थ राहील. शेजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदित करेल. प्रेमपूर्ण संबंधाचे महत्व लक्षात येईल. आर्थिक लाभ होईल.
कन्या (VIRGO) :आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासाची शक्यता आहे. आयात-निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल.
तूळ (LIBRA) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. मौज-मस्ती आणि मनोरंजनावर खर्च कराल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल.