मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. मात्र, जे आपल्या नोकरीतील कार्यक्षेत्रात बदल करू इच्छितात त्यांच्यासाठी आठवडा अजिबात अनुकूल नसल्याचं दिसत आहे. अशावेळी आपण जेथं आहात तेथेच राहणं आपल्या हिताचं होऊ शकेल. ह्या आठवड्यात व्यापारी अतिआत्मविश्वासात येऊन कामं करण्याची संभावना आहे. मात्र, अशावेळी त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. ह्या आठवड्यात आपणास एखाद्या मानसिक तणावाचा त्रास होऊ शकतो. तेव्हा आपण एकट्यानं वेळ न घालवता कुटुंबियांशी गप्पागोष्टी करण्यात वेळ घालवावा. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लाग शकतो. प्रेमीजनांच्या नात्यात सुद्धा काही तणाव असू शकतो. अशावेळी धीर धरण्याचा शहाणपणा दाखवावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करूनच यशस्वी होता येईल. हा आठवडा अत्यंत खर्चिक असल्याचं दिसून येईल. त्यामुळं पैश्यांची बचत करणं अवघड होईल.
वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारे प्रकृतीकडं दुर्लक्ष केल्यास आपणास ओटीपोटात काही त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती ह्या आठवड्यात कामानिमित्त प्रवास करू शकतात. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतार पाहावयास लागू शकते. हा आठवडा प्रेमीजनांना चांगलं परिणाम मिळवून देणारा आहे. ते आपल्या प्रेमिकेच्या सहवासात काही रोमँटिक क्षण घालवू शकतील. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. आपणास जर जमिनीशी संबंधित एखादी गुंतवणूक करावयाची असेल तर आपण ती करून त्यात लाभ मिळवू शकता. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात.
मिथुन (Gemini) :हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपली प्रकृती एकदम ठणठणीत राहील. परंतु आपण जर दुर्लक्ष केलेत तर एखादा जुनाट विकार पुन्हा उफाळून येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. ज्यांना नोकरीत बदल करावयाचा आहे त्यांच्यासाठी आठवडा सकारात्मक परिणाम देणारा आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्यानं त्यांनी ह्या आठवड्यात थोडं सावध राहावं. प्रणयी जीवनात वाद आणि शंका असल्याचं दिसू शकते. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. ते आपल्या जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. ह्या आठवड्यात आर्थिक आघाडीवर आपणास सावध राहावं लागेल. ह्या आठवड्यात एखाद्या बाहेरील वस्तूकडं आपण आकर्षित होण्याची संभावना असून त्यात आपला पैसा खर्च होऊन आपणास आर्थिक नुकसान होऊ शकते.
कर्क (Cancer) : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपली प्रकृती जरी चांगली राहिली तरी ऋतू बदलामुळं आपण सर्दी, खोकला इत्यादीने त्रस्त होऊ शकता. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होण्याची संभावना असल्यानं आपणास पैश्यांची कमतरता जाणवणार नाही. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात कार्यालयीन राजकारणा पासून थोडं सावध राहावं लागेल. व्यापाऱ्यांनी कोणताही निर्णय एखाद्या सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार घ्यावा. ह्या आठवड्यात आपल्या वैवाहिक जीवनातील माधुर्य टिकून राहील. ह्या आठवड्यात आपली भेट एखाद्या अशा व्यक्तीशी होईल की ज्यामुळं आपण अत्यंत प्रभावित होऊन तिच्या प्रेमात पडाल. ज्या व्यक्ती काही काळापासून एखाद्या गोष्टीमुळं तणावात आहेत. त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशकाची मदत होऊ शकेल.
सिंह (Leo) :नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. व्यावसायिक व्यक्ती अशा एखाद्या भव्य मेळाव्यात जाऊ शकतात, कि जो त्यांच्या व्यापारास प्रभावित करू शकेल. आपणास जर एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर आपणास लाभ प्राप्ती होऊ शकते. परंतु आपण जर शेअर बाजार किंवा सट्टा बाजारात आर्थिक गुंतवणूक केलीत तर आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ह्या आठवड्यात काही कारणानं आपण आणि आपली प्रेमिका ह्या दरम्यान दुरावा निर्माण होऊ शकतो. दांपत्य जीवनात सुद्धा समस्या आणि तणाव असू शकतो. ह्या सर्वास आपला घमंड कारणीभूत असेल. तेव्हा सावध राहावं. ह्या आठवड्यात आपण एखाद्या मानसिक तणावानं त्रस्त होऊ शकता. त्यातच घशातील संसर्ग सुद्धा ह्या आठवड्यात आपणास जास्त त्रस्त करू शकेल.
कन्या (Virgo) :हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. व्यापाऱ्यांची अशा एका व्यक्तीशी ओळख होईल कि ज्याला बाजाराशी संबंधित भरपूर ज्ञान असेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ग्रहांचं पूर्ण सहकार्य मिळेल. आपण मन लावून आणि पूर्ण मेहनतीनं आपली कामे कराल. ह्या आठवड्यात आपणास प्राप्ती सुद्धा चांगली होईल. परंतु, त्याच्या जोडीला आपले खर्च सुद्धा तितकेच जास्त होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या प्रेमिकेवर कोणत्याही प्रकारे शंका न घेणे आपल्या हिताचं राहील. विवाहित व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील कोणतीही जुनी गोष्ट जो पर्यंत उगाळणार नाही तो पर्यंत त्यांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. हि गोष्ट कुटुंब कलहास कारणीभूत ठरू शकते. ह्या आठवड्याच्या सुरूवातीस आपली प्रकृती काहीशी नरम असण्याची शक्यता आहे. अशावेळी तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळचं फिरणं आणि योगासन ह्यांना आपल्या जीवनातील एक भाग बनवावे.