हैदराबाद Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्या तिथीला 'पिठोरी अमावस्या' (Pithori Amavasya) असंही म्हणतात. महाराष्ट्रात या दिवशी 'पोळा' हा सण साजरा केला जातो. शेतकरी या सणाला बैलाची पूजा करून बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
सोमवती अमावस्या वेळ :2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनी अमावस्या सुरू होईल आणि 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार सोमवारी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे.
शुभ मुहूर्त : सोमवती अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममूर्त हा सकाळी 4 वाजून 38 मिनिट ते 5 वाजून 24 मिनिटापर्यंत आहे. पूजन मुहूर्त सकाळी 6 वाजून 9मिनिट ते 7 वाजून 44 मिनिटापर्यंत असणार आहे.
काय दान करावं :अमावस्येच्या दिवशी दानधर्म केल्यानं शुभ फळ मिळतं, असं मानलं जातं. यंदा सोमवती अमावस्येच्या दिवशी नवीन वस्त्रे, हिरवे मूग, पन्ना, पितळेचे भांडे, कापूर आणि पुस्तकं दान करणं शुभ मानलं जातं. केतू महादशा टाळण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी लसूण, तीळ, घोंगडी, कस्तुरी, उडीद इत्यादी वस्तूंचं दान करणं शुभ आहे.
हेही वाचा
- पाचव्या श्रावण सोमवारी वाहा 'सातूची' शिवामूठ; जाणून घ्या सातूचे आरोग्यदायी फायदे, 72 वर्षांनी आलाय 'हा' योग - Fifth Shravan Somvar 2024
- कृष्ण भेटला गं सखे कृष्ण भेटला! नाशिकच्या 200 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रुपांचं दर्शन - Shri Krishna Janmashtami
- उत्तर रामायण किंवा उत्तरकांड 'अस्सल' आहे का? - Is Uttara Ramayana Authentic