महाराष्ट्र

maharashtra

यश मिळविण्याच्या दृष्टीनं अनुकूल दिवस, तर 'या' राशींच्या घरात घडणार धार्मिक कार्य; वाचा राशीभविष्य - Horoscope 11 September 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 3:28 AM IST

Horoscope 11 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)

  • मेष (ARIES) : चंद्र आज आपल्या अष्टमात आहे. आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. आज शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका.
  • वृषभ (TAURUS) : चंद्र आज आपल्या सातवा लाभात आहे. आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. कुटुंबीयांसह सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे झाल्याने वेळ आनंदात जाईल. शरीर आणि मनाला प्रसन्नता वाटेल. सार्वजनिक जीवनात यश व कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून बातम्या मिळतील.
  • मिथुन (GEMINI) :चंद्र आज आपल्या सहावा लाभात आहे. आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्यादृष्टीनं अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश आणि कीर्ती लाभेल. इतरांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यास मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होतील.
  • कर्क (CANCER): चंद्र आज आपल्या लाभात आहे. आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमीत वाद-विवाद होऊन रुसवे-फुगवे होतील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण आपणास अडचणीत टाकेल. नवीन कार्यारंभ अथवा प्रवास न करणे हितावह राहील.
  • सिंह (LEO) : चंद्र आज आपल्या चौथ्या लाभात आहे. आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नकारात्मक विचारांमुळं निराशा येईल. पाण्यापासून धोका आहे. नोकरीत स्त्री वर्गापासून जपून राहा.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज आपल्या तिसरा असेल लाभात आहे. आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.
  • तूळ (LIBRA) : चंद्र आज आपल्या दुसरा असेल लाभात आहे. आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. आरोग्य बिघडेल. अवैध प्रवृत्तीत सहभागी होऊ नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.
  • वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज आपल्या प्रथम असेल लाभात आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक, मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ व प्रवास संभवतात. दांपत्य जीवनात प्रसन्नता अनुभवाल.
  • धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज आपल्या बारावा असेल लाभात आहे. आज आपल्या रागामुळं कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणं व वागणं हे एखाद्या वादाचं कारण ठरेल. एखादी दुर्घटना संभवते. आजारावर खर्च होईल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचलावे. निरुपयोगी कामांवर आपली शक्ती खर्च होईल.
  • मकर (CAPRICORN) : चंद्र आज आपल्या लाभात लाभात आहे. आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापार्‍यांची व्यापारात व नोकरदारांची नोकरीत प्राप्ती वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.
  • कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज आपल्या दशमात लाभात आहे. आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढती व धनप्राप्ती संभवते. कौटुंबिक जीवन आनंदी राहून आपली मान-प्रतिष्ठा वाढेल.
  • मीन (PISCES) : चंद्र आज आपल्या भाग्यात लाभात आहे. आजच्या दिवसाची सुरूवात भीतीने होईल. शरीरास आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. नशिबाची साथ मिळणार नाही. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. संतती हे आजच्या चिंतेचे प्रमुख कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details