महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

स्वातंत्र्यदिनी 'या' राशींना मिळेल खुशखबर; नोकरीची मिळेल नवीन संधी, वाचा राशीभविष्य - Horoscope 15 August 2024 - HOROSCOPE 15 AUGUST 2024

Horoscope 15 August 2024 : 15 ऑगस्ट रोजी देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 1:11 AM IST

  • मेष (ARIES) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. व्यापार-व्यवसायात सावध राहावं लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल.
  • वृषभ (TAURUS) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचं आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपारनंतर वाद होण्याची शक्यता असल्यानं बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. गूढ विषयांची आवड निर्माण होईल.
  • मिथुन (GEMINI) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल.
  • कर्क (CANCER) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. शत्रूवर विजय मिळवाल.विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळू शकेल.
  • सिंह (LEO) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील आणि शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळं आपणास संयमित राहावे लागेल. धन, कीर्ती यांची हानी संभवते. संततीसंबंधी एखादी काळजी निर्माण होईल. बौद्धिक वाद संभवतात. आर्थिक नियोजनासाठी मात्र दिवस अनुकूल आहे.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचं वातावरण असेल. परंतु दुपार नंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल. त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक, मानसिक आरोग्यावर होईल. आप्तांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता आहे. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अपघाताची शक्यता असल्यानं शक्यतो पाण्यापासून दूर राहावे.
  • तूळ (LIBRA) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज शारीरिक, मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. कुटुंबियांना आपल्यामुळं काही त्रास होणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. नवीन कामाच्या सुरुवातीसाठी आपण तयार व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो.
  • वृश्चिक (SCORPIO):चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपारनंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च संभवतात. प्रकृती नरम होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.
  • धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. दुपारनंतर शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारेल. मित्र आणि आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्यानं दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
  • मकर (CAPRICORN) :चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळं आपण आनंदित व्हाल. दुपारनंतर मानसिक, शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आज आपण आनंद आणि मनोरंजनासाठी खर्च कराल.
  • कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान-सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल. संततीच्या प्रगतीनं आपण सुखावून जाल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील.
  • मीन (PISCES) : चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. बौद्धिक विषयात आणि त्यासंबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह आणि थकवा दोन्हीही जाणवतील. हाती घेतलेले कार्य विना अडथळा पूर्ण करू शकाल. धनलाभ संभवतो.

ABOUT THE AUTHOR

...view details