महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींना आर्थिक लाभाची शक्यता, प्रेमीजणांना लाभेल सहवास ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य - Horoscope 31 August 2024

Horoscope 31 August 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 31 August 2024
आजचं राशीभविष्य (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 7:10 AM IST

मेष Horoscope 31 August 2024 : आज आपला स्वभाव हळवा झाल्यानं कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण आणि झोप ह्यात अनियमितता येईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. मनःशांतीसाठी प्रयत्न करावे लागतील. स्थावर मालमत्तेविषयी चर्चा टाळणं हितावह राहील.

वृषभ :आज चिंता कमी झाल्यानं हायसं वाटेल. आज आपण भावुक आणि संवेदनशील झाल्यानं कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती डोकं वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र यात आज आपण काम करू शकाल. कुटुंबीयांशी विशेषतः मातेशी सुसंवाद घडेल. छोटा प्रवास संभवतो. आर्थिक गोष्टींकडं लक्ष देऊ शकाल. आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल.

मिथुन :आज सुरवातीच्या त्रासानंतर आपण ठरवलेली कामं पार पडतील आणि त्यामुळे आपलं मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले किती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळाल्यानं तेथील वातावरण चांगलं राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासानं आनंदात भर पडेल. कुटुंबात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील.

कर्क : आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आज शारीरिक व मानसिक आनंदाचा उपभोग घेऊ शकाल.

सिंह :आज आपण कोर्ट - कचेरीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर आणि बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. काही गैरसमज होऊन आपले नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या :आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. संततीकडून सुखद बातम्या समजतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.

तूळ :आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. नोकरी करणार्‍यांना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. मातुला कडून फायदा होईल. सरकारी कामात सफलता मिळेल.

वृश्चिक :आज शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल, आळस वाढेल व उत्साह कमी होईल. त्याचाच परिणाम व्यावसायिक क्षेत्रात जाणवेल. त्यामुळे त्रास होईल. वरिष्ठ आज आपल्या कामगिरीवर नाखूष होतील. संततीशी मतभेद संभवतात. आज महत्वाची कामे स्थगित ठेवणे फायदेशीर ठरेल.

धनू :आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानकपणे एखादा आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. वाणी व वर्तणूक ह्यावर संयम ठेवावा.

मकर :आजचा दिवस आर्थिक बाबतीत लाभदायी आहे. व्यापारवृद्धी होईल. याखेरीज दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी पैसा मिळून धन भांडारात वाढ होईल. प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. स्वादिष्ट भोजन, नवी वस्त्रे व वाहनसौख्य मिळेल.

कुंभ :आजचा दिवस कामात यश मिळविण्यासाठी अनुकूल आहे. केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. तन मनाला उत्साह जाणवेल. नोकरी - व्यवसायात अपेक्षित सहकार्य लाभेल. मातुल घराकडून चांगली बातमी कळेल. खर्च वाढेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

मीन :आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. आपल्या स्वभावात जास्त हळवेपणा राहील. स्त्री स्नेह्यांसाठी खर्च होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details