महाराष्ट्र

maharashtra

'या' राशींना होईल आर्थिक लाभ, प्रिय व्यक्तीचा लाभेल सहवास ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य - Horoscope 30 August 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 9:40 AM IST

Horoscope 30 August 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 30 August 2024
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)

मेष Horoscope 30 August 2024 : आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील. आपल्या विचारात एकदम बदल होईल. दुपारनंतर मात्र मनाचा खंबीरपणा कमी होऊन मन विचारात गढून जाईल. मानसिक शैथिल्य जाणवेल. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहावे.

वृषभ :आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र आणि स्नेहीजनांच्या सहवासानं आपण आनंदित व्हाल. आज दिवसाचा बहुतांश वेळ आपण आर्थिक नियोजन करण्यासाठी द्याल.

मिथुन : आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणे हितावह राहील. व्यापार- व्यवसायात वातावरण अनुकूल असल्यानं मन प्रसन्न राहील. दिवसभर मनात उत्साह आणि चैतन्य दरवळेल.

कर्क : आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत, म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबीक वातावरण चांगलं राहील. मनातून नकारात्मक विचार दूर होऊ शकतील.

सिंह : आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आनंददायक आणि लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल. दुपारनंतर आपल्या बोलण्यामुळे काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता आहे. एखादी मानसिक चिंता सतावेल. कुटुंबीय आणि संतती यांच्याशी मतभेद होण्याचे प्रसंग घडतील. प्रकृतीस त्रास संभवतो.

कन्या : आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबीयांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. दुपार नंतर आपली उक्ती आणि कृती यांमुळे काही समस्या उदभवण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. जवळपासच्या एखाद्या रमणीय स्थळी सहलीस जाल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. मित्रांकडून लाभ होतील.

तूळ : आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य आणि आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यानं पदोन्नती मिळवण्याचा आपला मार्ग सुकर होईल. सामाजिक क्षेत्रातही मान- सन्मानाचे प्रसंग येतील. प्रकृती उत्तम राहील.

वृश्चिक : आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आपले बोलणं संयमित ठेवल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होऊ शकेल. पोटदुखीच्या विकारानं त्रस्त व्हाल. व्यावसायिक क्षेत्रात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. व्यापार - व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल.

धनू : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर मात्र मनात नकारात्मक विचारांचं वादळ निर्माण होईल. त्यामुळे मन दुःखी होईल. रागाचं प्रमाण वाढेल. कुटुंबीय आणि सहकार्यांशी वाद संभवतात.

मकर : आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. दुपारनंतर स्वकीय आणि मित्र यांच्या सहवासात आनंदित होऊ शकाल. वाहनसौख्य मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदित व्हाल.

कुंभ : आज आपल्यात कले विषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचं प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. आर्थिक लाभ होतील. व्यापार-व्यवसायात सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य लाभेल. वाणीवर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल.

मीन : आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणं हितावह राहील. अपचन आणि पोटाच्या तक्रारी यामुळे शारीरिक अस्वस्थता जाणवेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायक आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते.

ABOUT THE AUTHOR

...view details