- मेष: आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. व्यापार-व्यवसायात सावध राहावं लागेल. सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल.
- वृषभ: आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदानं आणि मित्रभेटीनं होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचं आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपारनंतर वाद होण्याची शक्यता असल्यानं बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. गूढ विषयांची आवड निर्माण होईल.
- मिथुन : आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल.
- कर्क: आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. शत्रूवर विजय मिळवाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळू शकेल.
- सिंह : आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील आणि शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळं आपणास संयमित राहावं लागेल. धन आणि कीर्ती यांची हानी संभवते. संततीसंबंधी एखादी काळजी निर्माण होईल. बौद्धिक वाद संभवतात. आर्थिक नियोजनासाठी मात्र दिवस अनुकूल आहे.
- कन्या: आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपारनंतर काही ना काही कारणानं आपण चिंतीत व्हाल आणि त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होईल. आप्तांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता आहे. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अपघाताची शक्यता असल्यानं शक्यतो जलाशयापासून दूर राहावं.
- तूळ : आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. कुटुंबियांना आपल्यामुळं काही त्रास होणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. नवीन कामाच्या सुरुवातीसाठी आपण तयार व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो.
- वृश्चिक: आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य आणि समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च संभवतात. प्रकृती नरम होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.
- धनू : आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. दुपार नंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. मित्राकडून भेटवस्तू मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
- मकर : आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आज आपण आनंद व मनोरंजनासाठी खर्च कराल.
- कुंभ : आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार-व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान-सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल. संततीच्या प्रगतीनं आपण सुखावून जाल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील.
- मीन : आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. बौद्धिक विषयात आणि त्यासंबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह आणि थकवा दोन्हीही जाणवतील. हाती घेतलेले कार्यविना अडथळा पूर्ण करू शकाल. धनलाभ संभवतो.
हेही वाचा -