महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

‘या’ पाच राशींवर शनीचा राहील प्रभाव; वाचा राशी भविष्य - Rashi Bhavishya For 22 June - RASHI BHAVISHYA FOR 22 JUNE

Horoscope 22 June 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 22 June 2024
राशी भविष्य (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 5:37 AM IST

  • मेष (ARIES) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल. उत्साह अजिबात वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्यानं आपली कामे बिघडतील. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळं कोणाचे मन दुखावणार नाही, ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल.
  • वृषभ (TAURUS) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणं हितावह राहील. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे.
  • मिथुन (GEMINI) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजन व आनंद-प्रमाद करण्याचा आहे. मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. दांपत्य जीवनाचे सौख्य उपभोगू शकाल.
  • कर्क (CANCER) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील.
  • सिंह (LEO) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. मित्रांचा सहवास आनंद देईल. हातून एखादे परोपकाराचे कार्य घडेल.
  • कन्या (VIRGO) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळं शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची प्रकृती बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी. अतिरिक्त पैसा खर्च होईल.
  • तूळ (LIBRA) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. परदेशातून आनंददायी बातम्या येतील. हितशत्रूंवर मात करू शकाल. सन्मान प्राप्ती होईल.
  • वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. वाणी संयमित ठेवल्यास कुटुंबात सुख-शांती नांदू शकेल. विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागेल. एखाद्या मांगलिक कामासाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे.
  • धनू (SAGITTARIUS): चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास संभवतात. नातेवाइकां कडील एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. स्वकीयांना भेटून आनंद होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आजचा आपला व्यवहार सामान्य राहील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती लाभ होईल.
  • मकर (CAPRICORN) :चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्यविषयक चिंता राहील. संतती व नातेवाईक ह्यांच्याशी मतभेद संभवतात. यश कष्टप्रदच होईल. मन व्याकूळ होईल. एखादा अपघात संभवतो.
  • कुंभ (AQUARIUS): चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी असेल. नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी-व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळं आपली कामे होतील. आज मोठे आर्थिक लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संततीशी सलोख्याचे संबंध राहतील. पत्नी व संतती ह्यांच्याकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. एखाद्या सहलीचे आयोजन करू शकाल.
  • मीन (PISCES) : चंद्र आज धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामे यशस्वीपणे होऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने आपला दिवस आनंदात जाईल. व्यापार वृद्धी होईल. वडील व वडिलधाऱ्या कडून फायदा होईल. एखादा मोठा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. सरकार कडून फायदा होईल. मान-सम्मान मिळेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details