महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

नवीन नात्याची सुरुवात आणि सरप्राईज डेटमुळं 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार लाभदायी - Today Horoscope - TODAY HOROSCOPE

Rashi Bhavishya For 11 June 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

horoscope rashi bhavishya for 11 june 2024 in marathi
मंगळवार राशीभविष्य (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 9:28 AM IST

मेष : आज कर्क राशीतील चंद्र तुमच्यासाठी चौथ्या भावात असेल. आज तुम्ही खूप संवेदनशील असाल. या कारणास्तव लोकांचे विनोद देखील तुम्हाला वाईट वाटू शकतात. आज तुम्ही तुमच्या आईच्या प्रकृतीबद्दल चिंतेत असाल. आज घर किंवा जमिनीचे कागदोपत्री काम करणे टाळावे. मानसिक चिंतेवर मात करण्यासाठी अध्यात्म आणि योगाची मदत घ्या. नदी, तलाव किंवा समुद्र इत्यादींजवळ जाणं टाळा. नोकरदारांनी आज संयमानं काम पूर्ण करावं.

वृषभ :कर्क राशीतील चंद्र आज तुमच्यासाठी तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे. आज मित्र आणि प्रियजनांच्या भेटीमुळं मन प्रसन्न राहील. आज तुम्ही गुंतवणुकीच्या नियोजनात व्यस्त असाल. दुपारनंतर बोलण्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात आज नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात. संध्याकाळी, तुम्ही मित्रांसोबत कुठंतरी बाहेर जाण्याचा किंवा सरप्राईज डेटसाठी जाण्याचा विचार करू शकता. मात्र, या काळात तुम्ही खाण्यापिण्यात बेफिकीर राहून तुमचंच नुकसान कराल.

मिथुन : कर्क राशीतील चंद्र आज तुमच्यासाठी दुसऱ्या भावात असेल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस लाभदायक आहे. आज मित्र आणि कुटुंबीयांच्या मदतीनं तुमची अवघड कामं सहज पूर्ण होतील. मनात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार ठेवले तर कोणतंही काम होणार नाही. व्यवसायात अनुकूल वातावरणामुळं मन प्रसन्न राहील. नोकरदार लोक आज रिलॅक्स मूडमध्ये असतील.

कर्क : कर्क राशीचा चंद्र आज तुमच्यासाठी पहिल्या घरात असेल. आज तुमचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यात वेदना होऊ शकतात. मानसिक चिंताही राहील. वाणीवर संयम ठेवा. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रमात राहू शकता. दुपारनंतर तुमचे प्रश्न सुटू लागतील. आर्थिक दृष्टिकोनातून लाभ होईल. शारीरिक आणि मानसिक स्थितीतही सुधारणा होईल. कुटुंबासोबत हा काळ आनंदात जाईल. मनापासून नकारात्मकता दूर ठेवा.

सिंह : कर्क राशीतील चंद्र तुमच्यासाठी बाराव्या भावात असेल. आज तुमच्या मनात राग आणि संतापाच्या भावना असतील. लोकांशी काळजीपूर्वक बोला. आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस शुभ नाही. मनात एखाद्या गोष्टीची चिंता राहील. कौटुंबिक सदस्यांशी वाद होऊ शकतात, परंतु दुपारनंतर तुमचा मूड आनंदी असेल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचे बेत आखता येतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. शक्य असल्यास, सकाळी जास्तीत जास्त वेळ शांत राहा, अन्यथा तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो.

कन्या : कर्क राशीचा चंद्र आज तुमच्यासाठी अकराव्या भावात असेल. तुमचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळू शकतात. नोकरदार लोकांच्या कामावर अधिकारी खुश राहतील. दुपारनंतर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळात पडाल. घाईगडबडीत कोणतंही काम करू नका. विवाहासाठी पात्र लोकांचं नातं कायमस्वरूपी होऊ शकते. मित्रांकडून तुम्हाला फायदा होईल. आज संध्याकाळी गाडी चालवताना किंवा बाहेर जाताना विशेष काळजी घ्या.

तूळ : कर्क राशीतील चंद्र आज तुमच्यासाठी दहाव्या भावात असेल. आज सकाळी तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त असेल. शारीरिक आळस राहील. नोकरीत अधिकारी तुमच्यावर नाराज असतील. मुलांशी मतभेदही होऊ शकतात, परंतु कार्यालयीन वातावरण दुपारनंतर सुधारेल. सामाजिक क्षेत्रातही मान-सन्मान मिळण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. संध्याकाळ कुटुंबासोबत घालवली जाईल.

वृश्चिक : कर्क राशीतील चंद्र आज तुमच्यासाठी नवव्या भावात असेल. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. वाणीवर नियंत्रण ठेवून परिस्थिती अनुकूल राहील. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. भागीदारीच्या कामात सावधगिरी बाळगा. पालकांच्या तब्येतीची चिंता असू शकते. संध्याकाळी मित्रांसोबत कुठंतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल.

धनु : कर्क राशीतील चंद्र आज तुमच्यासाठी आठव्या भावात असेल. आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहिल. सकाळी तुम्ही आनंद आणि मनोरंजनात मग्न व्हाल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. दुपारनंतर तुमच्या मनात अनेक नकारात्मक विचार येत असल्यामुळं तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही. काही जुन्या चिंता पुन्हा निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी जास्त वाद घालू नका. अध्यात्म तुम्हाला शांती देईल. कामाबरोबरच विश्रांतीकडंही लक्ष द्या.

मकर :कर्क राशीतील चंद्र आज तुमच्यासाठी सातव्या भावात असेल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस खूप चांगला असेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय दलाली, व्याज आणि कमिशनमधून मिळालेल्या पैशातून संपत्ती वाढेल. प्रेमींसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या घरी काही पाहुणेही येऊ शकतात. दुपारनंतर मित्रांसोबत बाहेर जाण्याचा बेत आखू शकाल.

कुंभ : कर्क राशीतील चंद्र आज तुमच्यासाठी सहाव्या भावात असेल. आज तुम्हाला कामात यश मिळेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दुपारनंतर तुम्हाला मनोरंजन आणि खरेदी इत्यादी गोष्टींमध्ये रस असेल. मित्र/प्रेयसीसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. कुटुंबासह बाहेर जाण्याचे बेत आखता येतील. हा काळ तुम्ही आनंदानं घालवू शकाल. जास्त कामामुळं थकवा जाणवू शकतो.

मीन : कर्क राशीतील चंद्र आज तुमच्यासाठी पाचव्या भावात असेल. आजचा दिवस चांगला जाईल. कलाक्षेत्रात तुमची आवड वाढेल. तुम्ही मित्रांना भेटाल, ज्यामुळं तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळू शकते. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. दुपारनंतर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रकृतीत राग अधिक असू शकतो. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आज तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील.

हेही वाचा -

  1. कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope

ABOUT THE AUTHOR

...view details