मेष (ARIES): आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस, थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाढल्यानं कामे बिघडतील. व्यवहारात न्यायी राहण्याचा प्रयत्न करा. निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. आपला प्रत्येक प्रयत्न चुकीच्या मार्गानं होण्याची शक्यता आहे.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या-पिण्याकडं विशेष लक्ष देणं हिताचं ठरेल. शारीरिक थकवा व मानसिक व्यथा अनुभवाल. कार्यालयात कामाचा व्याप वाढल्यानं अधिक थकवा जाणवेल. प्रवास लाभदायी होणार नाहीत.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. मित्र व प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल. प्रणयक्रीडेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भोजनात मिष्टान्न मिळेल. प्रकृती उत्तम राहील. सामाजिक मान-सन्मान होऊन प्रसिद्धी मिळेल. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल.
कर्क (CANCER) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात शांती, आनंदाचं वातावरण राहील. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. नोकरीत लाभ होतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासानं आनंद होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
सिंह (LEO) :आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळं दिवसभर मन आनंदी राहील. संततीच्यादृष्टीनं प्रगतीची बातमी मिळेल. अभ्यासाच्यादृष्टीनं विद्यार्थ्यांना खूप चांगला दिवस आहे. मित्र भेटतील. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. आज आपल्या हातून एखादा परोपकार घडेल.
कन्या (VIRGO) : आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवावी लागतील. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. पाण्यापासून काही त्रास संभवतो. मानहानी होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च होतील.
तूळ (LIBRA): आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घराशी संबंधित प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया सहलीस जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. व्यावहारीक कारणांनी प्रवास घडेल. नव्या कामाचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मिळेल. गुंतवणूक करण्यास दिवस अनुकूल आहे. नशिबाचा साथ लाभेल.