मेष (ARIES) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज आपलं मन चंचन झाल्यानं निर्णय घेणं कठीण जाईल आणि त्यामुळं महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रिक चर्चेत आपण सहभागी होऊ नये. आज छोटासा प्रवास संभवतो. आज स्त्रीयांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. साहित्य लेखनासाठी आजचा दिवस चांगला असल्यानं आपण आपली प्रतिभा शक्ती दाखवू शकाल.
वृषभ (TAURUS) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भावंडांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. कलावंत, कारागीर, लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.
मिथुन (GEMINI) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. शारीरिक, मानसिकदृष्टया आपणास प्रसन्नता आणि उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन आणि चांगले कपडे घालावयास मिळतील. मित्र आणि कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आर्थिक फायदा होईल. मनात येणार्या नकारात्मक विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करा. दांपत्य जीवन सुखावह होईल.
कर्क (CANCER) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळं मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळं प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मान - प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे.
सिंह (LEO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज व्यापारात लाभ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठया भावंडांचा सहवास मिळेल. एखादा मंगल प्रसंग असू शकतो. वैवाहिक जीवन चांगलं राहील. पत्नीचं सहकार्य लाभेल. आजचा दिवस नवीन वस्तू खरेदीला अनुकूल आहे.
कन्या (VIRGO) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार, नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यानं पदोन्नतीची संधी मिळेल. वडीलांकडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगलं राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचं राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.
तूळ (LIBRA) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात.