मेष (ARIES) :चंद्र आज कुंभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानी असेल. आजचा दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीची काही आनंददायी बातमी मिळेल किंवा भेट होईल. अचानक धन लाभ संभवतो. प्रवास होतील.
वृषभ (TAURUS) :आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आपल्या राशीपासून चंद्र दशम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. मित्र भेटीतून आनंद मिळेल.
मिथुन (GEMINI) : चंद्र आपल्या राशीपासून भाग्य स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता, शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचं सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. संततीबरोबर मतभेद होतील किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहावं लागेल.
कर्क (CANCER) :आपल्या राशीपासून चंद्र अष्टम स्थानी असेल. आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्यानं दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवाया पासून दूर राहणं सुद्धा फायदेशीर ठरेल.
सिंह (LEO) : आपल्या राशी पासून चंद्र सातव्या स्थानी असेल. आज पति-पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावं लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळं मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. भागीदारांशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. कोर्ट - कचेरीपासून शक्यतो दूरच राहा.
कन्या (VIRGO) : आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
तूळ (LIBRA) :आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी असेल. आपली वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळं इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा-वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानानं यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आहाराकडं लक्ष द्या. अजीर्णाचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन ह्यात गोडी निर्माण होईल.