महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

उज्ज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भेटीत नेमकं काय घडलं? - Ujjwal Nikam Meet Raj Thackeray - UJJWAL NIKAM MEET RAJ THACKERAY

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी आज (2 मे) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारदेखील उपस्थित होते.

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray at Shivtirth Find out what actually happened in the meeting
उज्ज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 1:47 PM IST

मुंबई Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : मुंबईतील मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसं मित्र पक्षातील नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेत असल्याचं बघायला मिळतंय. बुधवारी (1 मे) भाजपा नेते मिहीर कोटेचा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर शिवसेना (शिंदे गटाचे) खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे उमेदवार नरेश मस्के यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आज (2 मे) भाजपाचे मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान जवळपास एक ते दीड तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे सभा घेणार? : बुधवारी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ सभा घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र, ही सदिच्छ भेट असल्याचं सांगण्यात येतंय. तसंच कोकणात आणि मुंबईत राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं राज ठाकरेंनी कोकणात किंवा मुंबईत सभा घ्यावी अशी भाजपाची इच्छा आहे. परंतु, राज ठाकरे सभा घेणार की नाही याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

चुरशीची लढत होणार? : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उज्ज्वल निकम हे निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ आणि ताकदवान असल्यानं येथील लढत चुरशीची होणार असल्याचं बोललं जातंय. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा असून बांद्रा पूर्व, बांद्रा पश्चिम, खार, सांताक्रुज आणि विलेपार्ले या भागात संमिश्र लोकवस्ती आहे. तसंच इथं मनसेचीदेखील मोठी ताकद आहे. त्यामुळं मनसेची ताकद आपल्यासोबत असावी, तसंच मनसैनिकांनी प्रचारात उतरावं हे सांगण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं बोललं जातंय.

आज अनेक ठिकाणी अर्ज दाखल होणार : दुसरीकडं राज्यात आज अनेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. कल्याण येथे महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) उमेदवार श्रीकांत ठाकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असतील. या व्यतिरिक्त नाशिकमधून हेमंत गोडसे ह सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसंच भाजपाच्या उमेदवार भारती पवार यादेखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा -

  1. सहा याचिकांच्या निकाल द्यायचा असल्यानं विधानसभेच्या अध्यक्षांची आज कसोटी-उज्जवल निकम
  2. MLA Disqualification Case : नवा घटनात्मक पेच? नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाला अभिवचनच दिलं नाही; उज्ज्वल निकम यांची माहिती
  3. 16 MLA Disqualification Case : ...कोर्टाच्या निर्देशानंतर 16 आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची - उज्वल निकम

ABOUT THE AUTHOR

...view details