महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"आश्वासनं देवून खोऱ्यानं मतं...."; उदयनराजेंचा काँग्रेसवर हल्लाबोल - Udayanraje Bhosale

Udayanraje Bhosale On Congress : साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (शरद पवार गट) हल्लाबोल करत असल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता खोऱ्यानं मतं घेवून या नेत्यांनी जनतेकडं साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप उदयनराजेंनी केला आहे.

Udayanraje Bhosale says Congress leaders took huge votes by giving only promises
आश्वासनं देवून खोऱ्यानं मतं घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी जनतेकडं दुर्लक्ष केलं, उदयनराजेंचा हल्लाबोल

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 10:10 PM IST

सातारा Udayanraje Bhosale On Congress : काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासनं देऊन खोऱ्यानं मतं मिळवली. मात्र, निवडून आल्यानंतर जनतेकडं साफ दुर्लक्ष केलं. याचा सर्वसामान्यांनी विचार करून देशाला प्रगती पथावर नेणाऱ्या भाजपा सरकारच्या हाती सत्ता देण्याचं, आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, गुढे येथील संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

सत्तेत असताना धरणांची कामं का केली नाहीत? : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात बोलताना उदयनराजे म्हणाले की, "कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी मी केली होती. त्यानुसार हे महामंडळ स्थापन झालं. ढेबेवाडी खोऱ्यात असलेलं मराठवाडी धरण याच कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून तयार झालंय. काँग्रेसच्या नेत्यांकडं अनेक वर्षे सत्ता असताना अशी कामं त्यांनी का मार्गी लावली नाहीत?", असा संतप्त सवालही यावेळी उदयनराजेंनी केला.

लोक हितासाठी भाजपाचं सरकार सत्तेवर आणा : पाटण, महाबळेश्वर, जावली हा संपूर्ण सह्याद्रीचा परिसर पर्यटनाच्या विकासातून प्रगती करू शकतो. हे लक्षात घेऊन पर्यटनावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था आणण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळं लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेवर आणण्याचं आवाहन उदयनराजेंनी केलं.

पाटण मतदारसंघातून मोठे मताधिक्य देणार : यावेळी बोलत असताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताय. साताऱ्यासह राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांनी माझ्याकडं दिली आहे. तरीही पाटण विधानसभा मतदारसंघातून उदयनराजेंना मोठं मताधिक्य देण्याचा शब्द आपण मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तो शब्द पाटणची जनता पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. "भाजपा देशाचं भविष्य तर काँग्रेस भूतकाळ", उदयनराजेंचा हल्लाबोल - Udayanraje Bhosale
  2. "घोटाळे दाबण्याचा यशवंत विचार...", उदयनराजेंचा शरद पवारांवर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
  3. अबब...! दोन छत्रपती शेकडो कोटींच्या संपत्तीचे मालक - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details