महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

... म्हणून यशवंतरावांच्या सातारा जिल्ह्याची 'अशी' परिस्थिती, उदयनराजेंची काँग्रेस, शरद पवारांवर टीका - UDAYANRAJE BHOSALE

'सार्वजनिक बांधकाम' मंत्रिपद मिळाल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांचं रविवारी सातारा जिल्ह्यात आगमन झालं. आज त्यांनी चुलत बंधू, खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

Udayanraje Bhosale on Sharad Pawar
शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, शरद पवार (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 19 hours ago

सातारा: एकेकाळी सातारा हा यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्याच जिल्ह्यात महायुतीचे सर्व आमदार निवडून आले. याअगोदर अनेक लोकांना संधी असताना त्यांनी काही केलं नाही. केवळ घोषणा केल्या. म्हणूनच आज जिल्ह्याची अशी परिस्थिती झाल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale) काँग्रेस आणि शरद पवारांचं नाव न घेता केली.



पुरोगामी विचारांना चालना देणारा कौल : खासदार उदयनराजे पुढे म्हणाले की, अनेक चळवळी सातारा जिल्ह्यात निर्माण झाल्या. अशा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही. मात्र, आज एक सोडून चार मंत्रिपदं मिळाली आहेत. मतदारांनी पुरोगामी विचारांना चालना देणारा कौल दिला आहे. त्यामुळं मंत्री झालेल्या नेत्यांकडून जिल्ह्याच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. चारही मंत्री त्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी खात्री त्यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले (ETV Bharat Reporter)



समन्वय ठेऊन विकासकामे मार्गी लावणार :चारही मंत्री जिल्ह्यासह राज्याला न्याय देतील. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून चांगलं काम होईल, अशी मला खात्री असल्याचं खासदार उदयनराजेंनी यावेळी सांगितलं. तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी समन्वय ठेऊन जिल्ह्यातील विकासाची कामे मार्गी लावू, अशी ग्वाही उदयनराजेंनी दिली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच केलं औक्षण (ETV Bharat Reporter)


...तर शिवेंद्रराजेंनाच पालकमंत्रिपद मिळेल : संख्याबळाच्या निकषावर पालकमंत्री पद द्यायचं ठरलं असल्यास शिवेंद्रराजेंनाच ते मिळेल, असं सांगून खासदार उदयनराजे म्हणाले की, पालक मंत्रिपदासाठी अजून काही निकष लावणार असतील तर मला माहीत नाही. प्रत्येकाला संधी मिळावी आणि शिवेंद्रराजेंना का मिळू नये? दुसऱ्याला पालकमंत्रिपद मिळालं तरी मला वेदना होणार नाहीत. परंतु, प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे.


उदयनराजे कॅप्टन नव्हे मालक : टीम देवेंद्र फडणवीसांची असली तरी त्याचे कॅप्टन तुम्ही आहात, असं पत्रकारांनी म्हणताच उदयनराजेंनी हात जोडले. तसलं काही काढू नका. हे सगळेजण माझे किट काढून घेतील, असंही म्हणाले. त्यावर शिवेंद्रराजे म्हणाले की, उदयनराजे कॅप्टन नाहीत तर टीमचे मालक आहेत. शिवेंद्रराजेंना मंत्री केलं आता पालकमंत्री करणार का? या प्रश्नावर सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. समजून घ्यायच्या असतात, असं सूचक वक्तव्य उदयनराजेंनी केलं.

हेही वाचा -

  1. मराठी माणसावरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद; पाहा कोण काय म्हणालं?
  2. साताऱ्यातील दोन्ही राजेंची भेट...अन् 'झापुक झुपूक' गाण्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा, पाहा व्हिडिओ
  3. 'उपराकार' लक्ष्मण मानेंनी केली उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं कारण काय?

ABOUT THE AUTHOR

...view details