नाशिक Threat to Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधींप्रमाणेचं बॉम्बनं उडवून देण्याच्या धमकीचा फोन नाशिक पोलीस आयुक्तालयात आठ दिवसांपूर्वी आला होता. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. तसंच राहुल गांधींच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. असं असतानाच या संदर्भात चौकशी करत पोलिसांनी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा माथेफिरू असून याबाबतची माहिती नाशिक पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिली आहे. तसंच संबंधित व्यक्तीवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे.
बॉम्बनं उडवण्याची धमकी :यासंदर्भात अधिक माहिती देत पोलीस निरीक्षक सुभाष पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात एक कॉल आला होता. त्यात राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बनं उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक आणि इतर शाखांनी याबाबत शहानिशा केली असता ज्या व्यक्तीनं फोन केला होता तो गंगापूर रोड भागात राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार आम्ही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान तो मानसिक आजारानं त्रस्त असल्याचं आढळून आलं.
राहुल गांधी यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी प्रकरण, नाशिकमधून एक माथेफिरू ताब्यात - भारत जोडो न्याय यात्रा
Threat to Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी 'भारत जोडो न्याय यात्रे'निमित्त नाशिकमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच नाशिक पोलीस आयुक्तालयात राहुल गांधींना राजीव गांधींप्रमाणं बॉम्बनं उडवून देणार असल्याचा कॉल आला होता. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. तसंच राहुल गांधींच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. असं असतानाच आता नाशिक पोलिसांनी कॉल करणाऱ्या एका माथेफिरूला ताब्यात घेतलं आहे.
Published : Mar 2, 2024, 5:40 PM IST
राहुल गांधी घेणार काळाराम मंदिरात दर्शन : अयोध्येत 22 जानेवारीला झालेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांच्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिकच्या प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरातून केली होती. तसंच मंदिर परिसरात स्वच्छता करत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला होता. यानंतर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील श्री काळाराम मंदिरात सहपरिवार महापूजा केली होती. तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लवकरच काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचं म्हटलंय. असं असतानाच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील 12 मार्च रोजी श्री काळराम मंदिराला भेट देणार आहे.
हेही वाचा -