महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभेसाठी नरेंद्र खेडेकर निवडणुकीच्या रिंगणात; चार एप्रिलला भरणार अर्ज - lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी प्रत्येक पक्षाकडून उमेदवार चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

Narendra Khedekar
प्राध्यापक नरेंद्र खेडेकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 5:49 PM IST

प्रतिक्रिया देताना प्राध्यापक नरेंद्र खेडेकर

बुलडाणा lok Sabha Elections : महाविकास आघाडी शिवसेना उबाठा गटाचे नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखविला आहे. नरेंद्र खेडेकर यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरेंद्र खेडेकर यांचा सामना युतीच्याकडून जो उमेदवार दिला जाईल त्या शिवसेना उमेदवारासमोर थेट रंगणार आहे. अद्याप जिल्ह्यात 'वंचित' 2019 च्या निवडणुकीमध्ये मोठा गेम चेंजर ठरला होता. त्यामुळं आता 'वंचित'च्या निर्णयासोबत रविकांत तुपकर तसंच बुलढाणा वन मिशनच्या माध्यमातून गाव खेड्यापर्यंत अपक्ष म्हणून आपली ताकद आजमावत असलेले संदीप शेळके हे निवडणुकीवर काय प्रभाव टाकतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'ही' कामे करणार : चार एप्रिल रोजी संत श्री गजानन महाराज यांचं दर्शन घेऊन अर्ज भरणार असल्याचं नरेंद्र खेडेकर यांनी जाहीर केलंय. तसंच जिल्ह्यात चांगले उद्योग कसे येतील यासाठी आपण प्रयत्न करणार. सिंचन, बेरोजगारी, शेतकऱ्यांसाठी काम करणार. मागील अनेक वर्षांपासून अनेक विकास आराखडे थांबले आहेत त्यांना देखील चालना देणार. तसंच महायुतीकडून प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी मिळेल अशी खात्री देखील खेडेकर यांनी व्यक्त केली.


कोण आहेत नरेंद्र खेडेकर? : नरेंद्र खेडेकर सध्या उबाठा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. खेडेकर यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली असली तरी, मधल्या काळात ते काँग्रेसवासी झाले होते. काँग्रेसकडून त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदही भूषवलं होतं. मात्र चिखलीत राहुल बोंद्रे यांच्यामुळं खेडेकर यांच्या वाट्याला राजकीय वनवासच आला होता. विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकली नाही. दरम्यान तीन वर्ष आधी खासदार प्रतापराव जाधव यांनी खेडेकर यांना पुन्हा शिवसेनेत आणलं. मात्र, आता प्रतापराव जाधव शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानं उबाठा गटाच्या जिल्हा शिवसेनेचं नेतृत्व खेडेकर यांच्याकडं आलं आहे. आता खेडेकर बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.


हेही वाचा -

  1. महाविकास आघाडी राहिली 'वंचित', प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागांवरील उमेदवारांची केली घोषणा - Prakash Ambedkar news
  2. "शिंदे गटाचे मला रोज फोन, पण...", अंबादास दानवे यांचा गौप्यस्फोट; चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीवरुनही केलं भाष्य - Ambadas Danve
  3. नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी छगन भुजबळांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब? - Nashik Lok Sabha

ABOUT THE AUTHOR

...view details