महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला; यवतमाळ दौऱ्यावर घडली घटना, सामंत म्हणाले 'पोलीस करतील योग्य कारवाई' - uday samant - UDAY SAMANT

Uday Samant : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यवतमाळ-वाशिम दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनावर दगड फेकण्यात आलाय. याप्रकरणी माझ्या चालकाला पोलिसांत तक्रार देण्यास सांगितल्याचं त्यांनी सांगितलंय.

Uday Samant
उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला; सामंत म्हणतात याप्रकरणी पोलीस योग्य तपास करतील

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 8:53 AM IST

Updated : Apr 22, 2024, 9:01 AM IST

मुंबई Uday Samant : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा अवघ्या काही दिवसांवर आलाय. यासाठी महायुती तसंच महाविकास आघाडीतील घटक पक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका लावलाय. अनेक ठिकाणी प्रचारसभा, मेळावे तसंच बैठका घेतल्या जात आहेत. यातच आता महायुतीच्या प्रचारावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील एका वाहनावर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत

हल्ल्यात कोणी जखमी : प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगावात महायुतीची प्रचारसभा घेण्यात आली. या सभेवेळी उदय सामंत यांच्या ताफ्यातील एका वाहनावर दगड फेकण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यवतमाळमध्ये सभेसाठी आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदय सामंतही होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीनं दगड भिरकावत उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या ताफ्यातील कारची काच फुटलीय. तसंच यात कुणीही जखमी झालेलं नाही.

"वाशिम-यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी मी राळेगावमध्ये असताना मी ज्या गाडीमध्ये बसणार होतो, त्या गाडीवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला. यामुळं गाडीची काच फुटली. ही बातमी मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली आणि खात्री केली, तेव्हा हा प्रकार घडलेला होता. मात्र, या प्रकारात कुणालाही दुखापत झाली नाही, मी सुद्धा या गाडीत नसल्यानं सुखरूप आहे. हा अनुभव मला काही नवीन नाही, कारण पुण्यामध्येही अशा प्रकारचा हल्ला माझ्यावर झाला होता. परंतु, हा हल्ला का, कशासाठी, काय उद्देशानं झाला, कुणी दगड मारला हे कळालेलं नाही. दक्षता म्हणून आणि पोलीस दरबारी याची नोंद असावी म्हणून या हल्ल्याची तक्रार पोलीसांकडे देण्यासाठी मी माझ्या चालकास पाठवलंय."- उदय सामंत, उद्योग मंत्री

हेही वाचा :

  1. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपाच्या 'नारायण'अस्त्रासमोर शिंदेंच्या आशेचा 'किरण' मावळला - Kiran Samant
  2. किरण सामंतांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, रत्नागिरी मेळाव्यात शिवसेनिक आक्रमक; तुमच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्यात - उदय सामंत - Lok Sabha Election 2024
  3. निवडणूक लढवायची की नाही हा उद्योग मंत्री उदय सामंत यांचा प्रश्न; रत्नागिरी सिंधुदुर्गवर आमचा दावा - दीपक केसरकर - Lok Sabha Election 2024
Last Updated : Apr 22, 2024, 9:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details