महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'ना कोई टक्कर में है, ना कोई चक्कर मै'; ... तर अमरिशभाई तालुक्यात एमआयडीसी उभी करतील; स्मृती इराणी यांचं आश्वासन - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

शिरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या प्रचारार्थ आज माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शिरपूर येथे जाहीर सभा घेतली.

Smriti Irani
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2024, 7:06 PM IST

धुळे : शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार काशीराम पावरा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची शिरपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शिरपूर तालुका माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात सर्वच बाबतीत आघाडीवर आहे. येथे पाणी, रोजगार, शिक्षणाची उत्कृष्ट व्यवस्था आहे. अमरिशभाई पटेल यांचे प्रयत्न आणि काशिराम पावरा यांच्या सहकार्यानं तालुक्यात ४२ हजार आदिवासी मुले आज डॉक्टर, इंजिनिअर विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळं आपल्या तालुक्यात 'ना कोई टक्कर में है, ना कोई चक्कर मै'. काशिराम पावरा यांना आपण व्होट रूपी आशीर्वाद देणार यात काही शंका नाही. मात्र तुम्ही त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी केलं तर अमरिशभाई हे तालुक्यात एमआयडीसी देखील उभी करतील असं आश्वासन भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जाहीर सभेत दिलं.


केंद्रीय मंत्री स्मृती इराणी : शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा, महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ शहरात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी स्मृती इराणी म्हणाल्या, "शिरपूर तालुक्यात आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात शिस्तबध्द योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळं तालुका सुजलाम सुफलाम आहे. यासाठी मी भाईंचं अभिनंदन करते. आज समाजात पाण्यासाठीच महिलांचा निम्मा वेळ वाया जातो. मात्र शिरपूर तालुक्यात योग्य नियोजनामुळं पाण्याची भरभराट आहे. तुम्ही कोणालाही उपाशी ठेवले नाही. अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात तालुक्यातील ४२ हजार विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअरसह विविध पदावर तरुण देशभरात कार्यरत आहेत. त्यामुळं ते तुम्हाला आशीर्वाद देतीलच. पूर्वी डॉक्टर, इंजिनिअर मोठ्या घरात होत होते. मात्र तुमच्या सामाजिक, राजकीय जीवनामुळं तालुक्यात आदिवासी मुले देखील उच्चशिक्षण घेत आहेत. त्यामुळं 'ये पब्लिक हैं सब जानती है.' म्हणून या निवडणुकीत तुम्हाला व्होटरूपी आशीर्वाद नक्कीच मिळतील.

काशीराम पावरा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी शिरपुरात (ETV Bharat Reporter)

महिलांना मिळणार वर्षाला २५ हजार रुपये :व्यासपीठावर मी अमरिशभाईंशी चर्चा केली. त्यांना विचारलं की, आता तुम्ही तालुक्यात एमआयडीसी कधी बनवणार. यंदाही तुम्ही काशिराम पावरा यांना शानदार मतदान करून विजयी करा. त्यानंतर अमरिशभाई तालुक्यात एमआयडीसी देखील निर्माण करतील. "भाजपा महायुतीचं सरकार 'लाडकी बहीण योजना' राबवत आहे. या योजनेचा असंख्य महिला लाभ घेत आहेत. आपण पुन्हा भाजपा महायुतीचं सरकार निवडून दिलं तर महिलांना वर्षाला २५ हजार रुपये मिळणार आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसह सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं तुम्ही देखील भाजपा महायुतीला साथ द्यावी. आमदार पावरा यांना मोठ्या संख्येनं मतदान करावं", असंही आवाहन यावेळी स्मृती इराणी यांनी केलं.

...तर तालुक्याचा विकास बाजूला फेकला जाईल :मी पावरा यांच्या प्रचारासाठी नाही तर तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असल्याचंही इराणी म्हणाल्या. तर अमरिशभाई पटेल म्हणाले, "शिरपूर तालुक्यात चारशे बंधारे बनवले. एक लाख एकर जमीन सिंचनाखाली आणली. त्यामुळं पाचशे फुटावर लागणारे पाणी आता पन्नास ते दीडशे फुटांवर लागते. त्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं आहे. तालुक्यात टेक्सटाईल पार्कची निर्मिती केली. त्यात १२ हजार तरुण काम करतात. काँक्रीट रस्ते, भुमिगत गटारं, स्वच्छ पाणी, वीज पुरवठा अशा सर्वसोयी जनतेला उपलब्ध करून दिल्या. शिक्षणाचं सर्वोत्तम काम केलं. शिरपूर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तालुक्यातून ४२ हजार विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनर बनवलं. आज तालुक्यातील विद्यार्थी देश, विदेशात कार्यरत आहेत. आदिवासी मुलांना आयआयटीचं प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं आहे. अकराशे बेडचं अत्याधुनिक हॉस्पिटल तयार होत असून ते देशातलं एक सर्वोत्तम हॉस्पिटल राहील. आणखी बरंच काही करायचं आहे. जीवनात परिवर्तन करायचं असेल तर मुलांना चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे. सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असा महाराष्ट्रात एकमेव शिरपूर तालुका आहे. फक्त तुम्ही एक चूक केली तर तालुक्याचा विकास बाजूला फेकला जाईल". त्यामुळं यंदाही काशिराम पावरा यांना हजारो मतांनी निवडून आणावं, असं आवाहन अमरिशभाई पटेल यांनी केलं.

हेही वाचा -

  1. राष्ट्रीय नमो युवा महा-संमेलन! महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर न होताच प्रचाराचा नारळ फुटला
  2. शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् दिवसा मोफत वीज; पालघरमधील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन
  3. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीनंतर राजकारण तापले; मुख्यमंत्री अन् पंतप्रधानांची बॅग तपासता येते का? नेमका नियम काय?

ABOUT THE AUTHOR

...view details