अहिल्यानगर (अहमदनगर) : "अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नॉट रिचेबल राहणाऱ्या भाऊसाहेब कांबळेंनी विश्वासघात केला. तुम्हाला माझा पाठिंबा नाही आणि क्षमाही नाही. कांबळे माझे फोटो लावू नका", अशा तिखट शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी श्रीरामपूरचे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना सुनावलंय. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचार सभेदरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांनी भाऊसाहेब कांबळेंचा चांगलाच समाचार घेतला.
महायुतीत बिघाडी : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळतंय. महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवताय, तर त्याच बरोबर शिवसेनेनं देखील इथं भाऊसाहेब कांबळेंना धनुष्यबाणावर उमेदवारी दिली आहे. जागावाटपात श्रीरामपूरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्यानं भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी मागे घेणं अपेक्षित होतं. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते नॉट रिचेबल होते. त्यानंतर आता त्यांनी जोरदार प्रचार देखील सुरु केलाय. पण प्रचारादरम्यान कांबळेंच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूलमंत्री विखे पाटलांचा फोटो दिसत असल्यानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. त्यामुळं विखे पाटलांनी कांबळेंना आपला फोटो बॅनरवरुन काढण्यात यावा, असं सांगितलंय.
"भाऊसाहेब कांबळेंनी विश्वासघात केला, त्यांनी बॅनरवर माझे फोटो...", विखे पाटलांचा हल्लाबोल
श्रीरामपूर मतदारसंघातून महायुतीतील घटक पक्षातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलंय. मात्र, शिवसेनेच्या नेत्यानंही इथून उमेदवारी अर्ज भरल्यानं तिढा निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय.
Published : Nov 9, 2024, 2:18 PM IST
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? :यावेळी बोलत असताना विखे पाटील म्हणाले की, "भाऊसाहेब कांबळेंचं आता पुष्कळ झालं. ते माघारीच्या दिवशी नॉट रिचेबल होते. मात्र, आता रिचेबल आहेत. आमचे महायुतीचे उमेदवार फक्त आणि फक्त लहू कानडे हेच आहेत. भाऊसाहेब कांबळेंनी त्यांच्या बॅनरवर आता माझे फोटो अजिबात लावू नये. त्यांनी आमचा विश्वासघात केला. त्यामुळं त्यांना आमचा पाठिंबाही नाही आणि क्षमाही नाही. आपला निरोप हा वरचाही तोच अन् आतलाही तोच आहे. जे काही आहे ते मी स्पष्टपणे सांगतो", असं म्हणत विखे पाटलांनी भाऊसाहेब कांबळेंवर शरसंधान केलं.
हेही वाचा-