महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

विधानसभेत सत्ताधाऱ्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार उतरले आखाड्यात; नवीन रणनीती तयार - Assembly Election 2024 - ASSEMBLY ELECTION 2024

Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad pawar) हे पुन्हा एकदा जोरदारपणे विधानसभेच्या कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवारांनी आपली रणनीती बदलली असून आता विधानसभेसाठी वेगळी रणनीती आखात असल्याचं त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांनी सांगितलं. त्यामुळं पवार नेमकं काय करत आहेत? जाणून घेऊ....

Sharad pawar
शरद पवार फाईल फोटो (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 6:32 PM IST

Updated : Jun 17, 2024, 6:46 PM IST

मुंबई Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश प्राप्त झाल्यानंतर महायुतीचे धाबे दणाणले आहेत. झालेल्या चुका महायुतीने टाळण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीनं महायुतीच्या बैठका होत आहेत. भारतीय जनता पक्षाने यात आघाडी घेतली आहे. मतदारसंघ निहाय आढावा घेत कशा पद्धतीनं पुन्हा राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जागा जिंकता येतील याचा विचार सुरू केलाय. दुसरीकडं महाविकास आघाडीमधील नेत्यांनी सुद्धा आता हुरळून जाऊ नये, तर अधिक जोमानं लक्ष देऊन वेळप्रसंगी रणनीती बदलून निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे असा इशारा, शरद पवार (Sharad pawar)यांनी दिलाय. शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणुकीच्या कामाच्या तयारीचे संकेत दिले आहेत. मात्र, स्वतः शरद पवार हे सुद्धा तयारीला लागले आहेत.

राज्यातील परिस्थितीचा मागितला आढावा: शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा तातडीनं मागवून घेतला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये आपल्याला अधिक संधी मिळू शकते याबाबत त्यांनी अहवाल मागवला आहे. त्यानुसार राज्यात कोणत्या ठिकाणी किती जागा लढवायच्या याबाबतचा विचार सुरू केल्याची माहिती, पक्षातील नेत्यांनी दिलीय.

शरद पवार देणार तरुणांना संधी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी आता कामाला जोरदार सुरुवात केलीय. आमच्या पक्षाला किती जागा वाट्याला येत आहेत याचा विचार न करता थेट कामाला सुरुवात करणार ही शरद पवार यांची खासियत आहे. त्या पद्धतीनं त्यांनी कामाला सुरुवात केलीय.

नव्या उमेदवारांना संधी : अनेक मतदारसंघांमध्ये स्वतः शरद पवार भेटी देत आहेत आणि नवीन उमेदवार शोधत आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. ज्यांची जिंकून येण्याची क्षमता आहे आणि जे प्रामाणिकपणे लोकांसाठी लढणार आहेत अशा उमेदवारांच्या शरद शोधात पवार आहेत. तसेच उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे. पवार यांनी सोडून गेलेल्यांना परत न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं त्याबाबत विचार केला जाणार नाही, नव्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांचा विचार शरद पवार करत असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. "बीडच्या बप्पाचा दादांना फोन"; शरद पवार गटाच्या खासदाराबाबत अमोल मिटकरींचा मोठा दावा - Amol Mitkari On Bajrang Sonawane
  2. "संसदेच्या अधिवेशन काळात एनडीए 300..."; अजित पवारांना विश्वास - Ajit Pawar
  3. राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन बाहेर पडलेले शरद पवार आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? - NCP 25th Anniversary
Last Updated : Jun 17, 2024, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details