मुंबई Sharad Pawar on Nitish Kumar : जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. रविवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत महाआघाडीतून बाहेर पडत संध्याकाळपर्यंत त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश नवव्यांदा बिहारमध्ये सत्तेवर आले आहेत.
अशी परिस्थिती आधी कधी पाहिली नव्हती : नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्याबद्दल आणि बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "पाटणामध्ये जे काही घडले ते खूप कमी कालावधीत घडले. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. नितीशकुमार यांनीच फोन केल्याचं मला आठवते. पाटण्यातील सर्व भाजप वगळता इतर पक्षांच्या भूमिकंप्रमाण त्यांची भूमिका होती. पण गेल्या 10-15 दिवसांत असं काय झालं की त्यांनी ही विचारधारा सोडून आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी अचानक ( एनडीएसोबत) सरकार स्थापन केलं."
- जनता नितीश यांना धडा शिकवेल : यावर पुढं बोलताना शरद पवार म्हणाले की, "गेल्या 10 दिवसात ते असं कोणतंही पाऊल उचलतील असं वाटतं नव्हतं. उलट ते भाजपाच्या विरोधात भूमिका मांडत होते. अचानक काय झालं माहीत नाही. पण भविष्यात जनता त्यांना त्यांच्या या भूमिकेसाठी नक्कीच धडा शिकवेल."