छत्रपती संभाजीनगर Sanjay Raut : "एकनाथ शिंदे सेना तुम्ही सध्या भाजपाच्या XXX अवस्थेत आहेत' अशी घणाघाती टीका शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलीय. लोकांना हा चेहरा नको, गब्बरनंतर कोणाला लोक घाबरत असेल तर हा चेहरा आहे. पंतप्रधान असून देखील त्यांच्या भाषणात मटण, चिकन बाबत बोलावं लागतंय. मटण बाबत बोलतात आणि बिफ कंपन्यांकडून साडे पाचशे कोटींचा फंड घेतात हे चालत का? मागील दहा वर्षात यांनी काय केलं हे देखील यांना सांगता येत नाही, ते पराभूत वृत्तीनं बोलत आहेत," अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केलीय. तसंच "कंगना पराभूत होत असून ते पार्सल पुन्हा मुंबईत येईल," असा टोला त्यांनी लगावलाय.
वंचित सोबत राहावं यासाठी प्रयत्न होते : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गट आणि भाजपानं 20 जागांवर फिक्सिंग असल्याचा आरोप केल्या. त्यावर "20 जागांवर आम्ही भाजपाच्या उमेदवारांचा पराभव करणार हे फिक्स आहे. राजकारण आम्हाला कळतं संविधान आम्हाला कळतं. कोण कोणाविषयी काय बोलता आम्हाला कळत, आंबेडकर आमच्या सोबत राहावं यासाठी हात जोडले. लोकशाही धोक्यात आहे अशा परिस्थितीत आंबेडकर सोबत असायला हवे. त्यांना आम्ही 6 जागा दिल्या. यासाठी साक्षीदार पटोले व चव्हाण इतर नेते आहेत. आंबेडकरांनी आट मार्ग निवडलाय. मात्र भविष्यात कधीतरी ते एकत्र येतील," असं राऊत म्हणाले. "आंबेडकर यांचा अनेकांशी वाद सुरु आहे, आम्ही त्यात का पडावं? मुख्य प्रवाहात वंचित आघाडीनं सहभागी व्हावं पण त्यांची भूमिका वेगळी," असल्याचं राऊत म्हणाले.
वडेट्टीवार यांनी मागितली जागा बदलून : उत्तर मुंबईची जागा काँग्रेसनं आम्हाला मागून घेतलीय. घोसाळकर निवडणूक लढले तर गोयल यांचा पराभव निश्चित होईल. त्यांच्याकडे उमेदवार नसेल तर मोठ्या मनानं ती जागा आम्हाला द्यावी, असं राऊत यांनी सांगितलंय. सांगलीत विशाल पाटील बंडखोरी करायची चूक करणार नाही, मागे पण त्यांनी तस केलं होत, असं केलं तर मोठी चूक होईल असं देखील त्यांनी सांगितलं. मी संभाजीनगर इथं आलो मला वाटलं शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर झाला असेल मात्र अद्याप नाही. कुठं घोडं अडलं कळत नाही. आमच्या विरोधात कोणीही लढलं तरी खैरे निवडून येतील, दलीत मुस्लिम बांधव समोर आले आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून येतील. जालना, लातूरमध्ये बदल होईल. बीडमध्ये पंकजा यांना अवघड जाईल अस संजय राऊत यांनी सांगितलं.
मोदींना आणून दुष्काळ दाखवा : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना नागरिक करताना दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यात आणावं आणि हा सर्व दुष्काळ त्यांना दाखवावा. मटन आणि चिकन वर बोलून होत नाही, तर या लोकांना त्यांनी मदत करायला पाहिजे असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- नाक रगडण्यासाठी मातोश्रीवर आला होतात, कोण नकली, कोण असली हे ठरवणारे तुम्ही कोण- राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल - Sanjay Raut News
- महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष 'नमो निर्माण' पक्ष का झाला? संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला - Lok Sabha election 2024