महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

आमच्या नेत्यांचे फोटो लावता डोनाल्ड ट्रम्प यांचाही लावा; संजय राऊतांची राहुल जगताप यांच्यावर टीका - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात सभा घेतली.

Sanjay Raut
संजय राऊत (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2024, 8:11 PM IST

Updated : Nov 7, 2024, 8:18 PM IST

अहिल्यानगर: आमच्या नेत्यांचे फोटो लावून मते मागता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचाही फोटो लावा, संजय राऊत यांची राहुल जगताप (Rahul Jagtap) यांच्यावर टीका. साजन पाचपुते यांना वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की, श्रीगोंद्यातून लढायचं त्यावेळी त्याची तयारी नव्हती. आधी उमेदवारी मग तयारी ही शिवसेनेची खासियत आहे. श्रीगोंदा येथील वांगदारी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते.


फडणवीस यांच्याकडं जगताप याचं रिमोट :आमच्यावर आरोप करणाऱ्या राहुल जगताप यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले अशा लोकांना महाविकास आघाडी उमेदवारी कशी देणार. आता त्यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहे. त्यामुळं फडणवीस जगताप यांना ऑपरेट करतात असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय. तसेच शरद पवार हे अनुराधा नागवडे यांच्या पाठीशी असल्याचा दावा देखील त्यांनी सभेत केलाय. नागवडे यांना एक संधी द्या आम्ही विकास काय असतो ते दाखवून देऊ असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

प्रतिक्रिया देताना संजय राऊत (ETV Bharat Reporter)

...त्यापेक्षा जास्त आमदार निवडून येतील : गेली चाळीस वर्ष जे श्रीगोंद्यात होऊ शकलं नाही ते नागवडे यांच्या विजयानंतर विकासाच पर्व श्रीगोंद्यात सुरु होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेत येण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही. या प्रवाहात श्रीगोंद्याचा आमदार असायला हवा अशी आमची भावना आहे. सरकार बनवायला जेवढे आमदार लागतात त्यापेक्षा जास्त आमदार निवडून येतील. माझ्या अंदाजे 165 ते 170 जागा महाविकास आघाडी जिंकेल असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा -

  1. मुलुंडमध्ये भाजपा गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? जाणून घ्या मतदारसंघाची गणितं
  2. "ते माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार, मी प्रचाराला जाणार," नवाब मलिकांबाबत अजित पवारांची भूमिका स्पष्ट
  3. उबाठाच्या तीन प्राथमिकता नोकरी . . नोकरी अन् नोकरी; धारावीत उभारणार वित्तीय केंद्र, उद्धव ठाकरेंनी जाहीर केला वचननामा
Last Updated : Nov 7, 2024, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details