महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

जागावाटपावरुन महाविकास आघाडीत नाराजीनाट्य; नाना पटोलेंचा संजय राऊतांवर गंभीर आरोप - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) सर्व जागा घोषित केल्या आहेत. त्यामुळं जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी या तिढ्याला संजय राऊत (Sanjay Raut) हे कारणीभूत होते, हे आता स्पष्ट झालं, असा थेट आरोपच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलाय. मात्र, आता तो सर्व भाग विसरून तानाशाहीविरोधात एकत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे, असंही पटोले यांनी स्पष्ट केलंय.

Nana Patole on Sanjay
नाना पटोले आणि संजय राऊत

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 4:01 PM IST

Updated : Apr 9, 2024, 4:30 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि कोणत्या पक्षाला कोणती जागा हे संयुक्त पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आलंय. मात्र, हे घोषित झाल्यानंतर वादग्रस्त असलेल्या भिवंडी, सांगली आणि उत्तर मुंबई या जागांबाबत असलेला तिढा जरी सुटला असला तरी मनातील अढी अद्याप गेलेली नाही, हे स्पष्ट होतंय. महाविकास आघाडीतील नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे अजूनही नाराज असल्याचं दिसत आहे.



संजय राऊत यांनी तणाव वाढवला: महाविकास आघाडीतील जागा वाटपावर गेल्या अनेक दिवसांपासून असलेला तणाव हा शिवसेना पक्षाकडून विशेष संजय राऊत यांच्याकडून वाढवल्या गेल्याचा थेट आरोप नाना पटोले यांनी केलाय. पत्रकार परिषदेत जागा वाटपाची यादी न वाचून दाखवता पटोले यांनी आपली एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली होती, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, यावरून तुम्हाला निश्चित कळलं असेल की, युतीमधील तणाव संजय राऊत यांनीच कसा वाढवला होता.


समजूतदारपणा दाखवावा लागतो : आघाडीचा धर्म पाहताना अनेक गोष्टींचं भान बाळगावं लागतं. सांगली आणि उत्तर मुंबईच्या जागेबाबत आम्ही आग्रही होतो. परंतु, एखादी गोष्ट कुठपर्यंत आणायची हे आम्हाला माहित आहे. सांगली भिवंडीच्या जागेबाबत आम्ही हाय कमांडकडं वारंवार मागणी नोंदवली. मात्र, शेवटी आघाडी धर्म पाळण्यासाठी आम्ही एक पाऊल मागे घेतल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलंय.



वर्षा गायकवाड यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न: मुंबईतल्या जागांबाबत मुंबईच्या काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पक्षाच्या श्रेष्ठींकडं राज्यातील नेत्यांची तक्रार केल्याबद्दल विचारलं असता पटवली म्हणाले की, महायुतीच्या वतीनं महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये कसा गैरसमज निर्माण होईल याकडं लक्ष दिलं जातय. वास्तविक मुंबईच्या जागांबाबत आम्ही सर्वच आग्रही होतो. या सर्व बैठकांना वर्षा गायकवाड या स्वतः उपस्थित होत्या. त्यामुळं मीच सर्वाधिक या जागांसाठी आग्रही होतो हे सर्वांना माहीत आहे. आता काही गोष्टी या आघाडीमध्ये समजून घ्याव्या लागतात. वर्षा गायकवाड या सुद्धा याबाबतीत निश्चित समजून घेतील.



कदम, पाटील यांची समजूत काढणार : सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढणार का? यावर पटोले म्हणाले की, विशाल पाटील हे अपक्ष निवडणूक लढणार नाहीत. निश्चितच विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे या जागेबाबत आग्रही होते. तसेच ते नाराज आहेत याबद्दलही काही दुमत नाही. मात्र, आपलं विश्वजीत कदम यांच्याशी बोलणं झालं असून त्यांची नाराजी आपण लवकरच दूर करू. ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील आणि त्याचे प्रचार करतील यात कुठलीही शंका नाही असा विश्वासही, पटोले यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा -

  1. अखेर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर, वाचा संपूर्ण यादी - lok Sabha election 2024
  2. काँग्रेसला दिली कारल्याची उपमा, तर नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंनाही डिवचलं; चंद्रपूरच्या सभेत मोदींची चौफेर फटकेबाजी - PM Narendra Modi Chandrapur Sabha
  3. 'त्या' प्रश्नावरून नवनीत राणा म्हणाल्या, " नवरा बायकोमध्ये भांडण लावू नका" - lok Sabha election 2024
Last Updated : Apr 9, 2024, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details