महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक विरुद्ध फहाद अहमद सामना रंगणार, कोण मारणार बाजी?

आता नवाब मलिक यांच्या जागी त्यांची मुलगी सना मलिक शेख या जागेवरून निवडणूक लढवत आहे. व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या सना दीर्घकाळापासून मतदारसंघात सक्रिय आहेत.

Fahad Ahmed and Sana Malik
फहाद अहमद आणि सना मलिक (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

मुंबई-मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात लोकप्रिय मतदारसंघ आहे. याचे कारण आहे महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक इथून आमदार राहिलेले आहेत. 2009 मध्ये या जागेवरून नवाब मलिक विजयी झाले होते, मात्र पुढच्या निवडणुकीत नवाब मलिक यांचा शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. यानंतर 2019 मध्ये नवाब मलिक यांनी जोरदार पुनरागमन केले आणि पुन्हा विजय मिळवला. परंतु आता नवाब मलिक यांच्या जागी त्यांची मुलगी सना मलिक शेख या जागेवरून निवडणूक लढवत आहे. व्यवसायाने वास्तुविशारद असलेल्या सना दीर्घकाळापासून मतदारसंघात सक्रिय आहेत. नवाब मलिक तुरुंगात गेल्यावर सनानेच जबाबदारी सांभाळली होती. 15 ऑगस्टच्या पोस्टमध्ये नवाब मलिक यांनी आपण अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे स्पष्ट केले होते.

सना खान यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी:मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील लढत रंजक होत चाललीय. काका-पुतण्याच्या वेगवेगळ्या गटात विभागलेली ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आलीय. पुतण्या अजित पवार यांनी महाराष्ट्रातील वादग्रस्त मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना खान हिला या जागेवरून उमेदवारी दिली. प्रत्येक जागेवर पुतण्याला कडवी टक्कर देण्याचा मानस असलेले काका शरद पवार यांनी या जागेवर अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिलीय. ही जागा अल्पसंख्याकबहुल आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या जागेवरून कायम निवडणूक जिंकत आलेत.

फहाद अहमद महाविकास आघाडीचे उमेदवार: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद हे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईच्या अणुशक्ती नगरमधून निवडणूक लढवत आहे. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या समर्थनार्थ एका सभेला संबोधित केले होते. त्यामुळे अणुशक्तीनगर मतदारसंघात फहाद अहमद आणि सना मलिक शेख यांच्यात लढत होणार आहे.

सना मलिक काय करतात?:नवाब मलिक यांची मुलगी सना शेख आर्किटेक्ट, वकील आणि व्यावसायिक महिला आहेत. त्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. सना मलिक शेख या बीए आर्किटेक्टचे शिक्षण घेऊन एलएलबी केलंय. नवाब मलिक यांच्या या जागेवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडणूक लढवत आहेत.

नवाब मलिक दोनदा विजयी:मुंबईच्या 36 विधानसभा जागांपैकी अणुशक्ती नगर जागा 2008 च्या सीमांकनानंतर स्थापन झाली. ही जागा 2009 मध्ये नवाब मलिक यांनी जिंकली होती, मात्र 2014 मध्ये त्यांचा शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काटे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक पुन्हा एकदा विजयी झाले. 2019 मध्ये या जागेवर नवाब मलिक यांनी शिवसेनेचे तुकाराम काटे यांचा सुमारे 10 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये याच जागेवर शिवसेनेचे तुकाराम काटे यांनी राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा अवघ्या 1007 मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वी 2009 मध्ये नवाब मलिक यांनी तुकाराम काटे यांचा 6825 मतांनी पराभव केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक मंत्री राहिलेत. नवाब मलिक यांनी अणुशक्तीनगर मतदारसंघातून माघार घेत आपल्या मुलीला पुढे केल्यानंतर आता अणुशक्तीनगरमध्ये दोन उमेदवारांमध्ये निवडणूक लढली जाणार आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमीही या भागात सक्रिय झालेत.

कातेंचा 12751 मतांनी पराभव:2019 मध्ये अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 51 हजार 916 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 1 लाख 39 हजार 226 होती. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवाब मलिक विजयी होऊन आमदार झालेत. त्यांना एकूण 65217 मते मिळालीत. शिवसेनेचे उमेदवार तुकाराम रामकृष्ण काटे 52466 मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. त्यांचा 12751 मतांनी पराभव झाला होता.

मनसेदेखील महत्त्वाचा फॅक्टर:अणुशक्ती नगर या मतदारसंघात मनसेचाही दबदबा आहे. मनसेला 2009 च्या विधानसभा निवडणुकीत 16 हजार 737 मते, 2014 च्या निवडणुकीत 3 हजार 285 मते आणि 2019 च्या निवडणुकीत 5 हजार 879 मते मिळाली होती. 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली असताना या अणुशक्तीनगर जागेवर काँग्रेसला 17 हजार 615 मते मिळाली होती. यानुसार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मते स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांच्या बाजूने गेली तर त्यांचा विजय निश्चित आहे, कारण भाजपाचे मतदार सना खानला कितपत साथ देतील हे सांगता येत नाही.

2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस 65217
तुकाराम काते शिवसेना 52466
यासिन सय्यद अपक्ष 7701
2014 विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
तुकाराम काते शिवसेना 39966
नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस 38959
विठ्ठल खरटमोल भाजपा 23767
2009 विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस 38,928
तुकाराम काते शिवसेना 32,103
नवीन आचार्य मनसे 16,737

हेही वाचा-

  1. कोल्हापूरच्या राजघराण्यातील सदस्याविरोधात कशी असणार रणनीती? पाहा राजेश क्षीरसागर यांची EXCLUSIVE मुलाखत
  2. व्हीलचेअर, वॉकर घेऊन मनसेच्या उमेदवारानं दाखल केला अर्ज; कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ABOUT THE AUTHOR

...view details