महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अबब...! मुख्यमंत्री सुपुत्राच्या संपत्ती वाढीचा दर बघून डोळे होतील पांढरे; तर कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर सर्वाधिक गुन्हे? - Lok Sabha Election - LOK SABHA ELECTION

Lok Sabha Election 2024 : राज्यात सोमवारी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह 13 जागांवर मतदान होणार आहे. यात सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार हे उत्तर मध्य मुंबई मतदार संघात आहेत. तर पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. मुंबई वोट्स या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.

अबब...! मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांचा संपत्ती वाढीचा दर बघून डोळे पडतील पांढरे; तर कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर सर्वाधिक गुन्हे?
अबब...! मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांचा संपत्ती वाढीचा दर बघून डोळे पडतील पांढरे; तर कोणत्या पक्षाच्या उमेदवारांवर सर्वाधिक गुन्हे? (Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 9:16 PM IST

किरण पावसकर (ETV Bharat Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यात 13 लोकसभा जागांसाठी निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडत असताना यात मुंबईतील 6 तसंच पालघर, कल्याण, ठाणे, भिवंडी या महामुंबईतील 4 जागांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघातही सोमवारी रोजी मतदान होत आहे. यात सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार हे उत्तर मध्य मुंबई मतदार संघात आहेत. तर पालघर लोकसभा मतदार संघामध्ये सर्वात कमी उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. मुंबई वोट्स या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.



उत्तर-मध्य मुंबईत सर्वात जास्त उमेदवार : राज्यात 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी 20 मे रोजी राज्यात पाचव्या टप्प्यात मतदान होत असून, यात मुंबईतील सर्व 6 जागांचा समावेश आहे. यासोबत ठाणे, पालघर आणि कल्याण अशा एकूण 9 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार त्याचबरोबर त्यांचे राजकीय पक्ष उमेदवारांची संपत्ती, जाहीरनामे आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबत मुंबई वोट्स या संस्थेनं सर्वेक्षण अहवाल केला. यानुसार मुंबईत सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार हे उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात आहेत. तर सर्वाधिक कमी गुन्हेगारी असलेले उमेदवार हे पालघर लोकसभा मतदार संघात आहेत. उत्तर-मध्य मुंबईमध्ये एकूण 27 तर पालघर लोकसभा मतदार संघात एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, त्यात आंदोलनासारखे किरकोळ स्वरुपातील गुन्हे हे शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारांवर असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या आणि शिवसेना शिंदे गट हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडं खून, धमकावणं, खंडणी अशा गंभीर स्वरुपातील गुन्ह्यांची नोंद असलेले उमेदवार हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीत सर्वात पहिल्या क्रमांकावर असून समता पक्ष दुसरा आणि रिपब्लिकन बहुजन सेना पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबईत पियुष गोयल सर्वात श्रीमंत उमेदवार : उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार भाजपाचे पियुष गोयल हे मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडं 110.96 कोटींची संपत्ती आहे. तर त्या पाठोपाठ उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याकडं 54.21 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसंच याच उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील भारत जनआधार पक्षाचे उमेदवार सुरींदर अरोरा यांच्याकडं 40.47 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपत्ती वाढीचा दर हा सर्वात जास्त 669 टक्के इतका आहे. तर त्या खालोखाल दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार व आताचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या संपत्ती वाढीचा दर हा 619 टक्के इतका आहे. तर महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या संपत्ती वाढीचा दर हा फक्त 3.5 टक्के इतका आहे.

गुन्हे कुठल्या स्वरुपाचे, किती गंभीर : याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर म्हणाले की, "गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असले तरीसुद्धा हे गुन्हे किती गंभीर स्वरुपाचे आहेत ते महत्त्वाचं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना काही वेळेला गुन्हे घडत आहेत. आपण आंदोलनं केलेली आहेत. मोर्चे काढलेले आहेत. काहींचे भ्रष्टाचार आहेत. काही गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. काहींचा निपटारा झालाय. म्हणून याबाबत चौकशी करणं गरजेचं आहे."

हेही वाचा :

  1. "… तर तेव्हाच मी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो”...; छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट - Lok Sabha Election 2024
  2. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास भाजपासह अजित पवारांचा होता विरोध, संजय राऊत यांनी 'हे' सांगितलं कारण - Sanjay Raut news

ABOUT THE AUTHOR

...view details