महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

अजित पवारांना झटका, शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' दोन उमेदवार - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. अशात आज महायुतीतील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून आला.

Maharashtra Assembly Election 2024
राजश्री अहिरराव आणि समीर भुजबळ (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 10:48 PM IST

नाशिक : महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आज दिसून आलं. विशेषतः जागा वाटपात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या, त्या खालोखाल मुख्यमंत्री शिंदे यांना जागा मिळाल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कमी जागा देऊनही शेवटच्या क्षणी महायुतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला पुन्हा एकदा झटका दिलाय. नाशिक जिल्ह्यातील दोन जागांवर शिंदेंच्या शिवसेना पक्षाने दोन उमेदवारांना एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केली.


सर्वाधिक कमी जागा कोणाला :विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा घेतल्या. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला जागा मिळाल्या आणि सर्वाधिक कमी जागा या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडल्या. मात्र असं असताना अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास शिल्लक असताना नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेने दोन उमेदवार जाहीर केले. विशेषतः विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी मतदारसंघात माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर केली.

राजश्री अहिरराव यांना उमेदवारी: देवळाली मतदारसंघात आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असतांना, अहिरराव यांनी शिवेसनेचा एबी फॉर्मसोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता या मतदारसंघात उमेदवारांबाबत तोडगा निघतो की, मैत्रीपूर्ण लढत होते हे माघारीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.



समीर भुजबळ यांच्या बंडाला उत्तर? :मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. समीर भुजबळ यांनी केलेल्या बंडामुळं महायुतीत आधीच ठेणगी पडली. त्याचा वचपा काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील अजित पवार पक्षाच्या दोन उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार जाहीर केल्याची चर्चा सर्वत्र आहे.

हेही वाचा -

  1. हवाई प्रवासावर नेत्यांची भिस्त; कमी कालावधीत राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी हेलिकॉप्टर प्रवासाला प्राधान्य
  2. महायुतीत भाजपा तर महाविकास आघाडीत काँग्रेसच 'थोरला भाऊ'; शरद पवार अजित पवारांवर पडले भारी
  3. "भाजपा-शिंदेंचा महाराष्ट्रावर दुष्ट डोळा, यांच्यामुळं...."; आदित्य ठाकरेंचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details