महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

निवडणुकीनंतर राज ठाकरे भाजपासोबत येणार का?; प्रवीण दरेकर म्हणाले राजकारणात कोणीही...

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. पुण्यात आज प्रवीण दरेकरांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी खास बातचित केली.

pravin darekar on raj thackeray
प्रवीण दरेकर आणि राज ठाकरे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

पुणे: विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील आपले उमेदवार उभे केले आहेत. या विधानसभा निवडणुकीत मनसे वेगळं लढताना पाहायला मिळत आहे. अश्यातच भिवंडीसह अनेक मतदारसंघात भाजपाकडून मनसे उमेदवाराला पाठिंबा दिलं जात असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे भाजपासोबत येणार का अशी चर्चा देखील सुरू झालीय. याबाबत भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले, "राजकारणात कोणीही कोणाच्या बरोबर जाऊ शकतो आणि उद्या जर राज ठाकरे आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही".

महायुतीला मिळेल यश: भाजपा नेते प्रवीण दरेकर राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत म्हणाले, "महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी काय पेरलं आहे हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. ठप्प सरकार, स्थगिती सरकार आणि दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीचं गतिशील सरकार पाहिलं आहे. तसंच गरिबांचं कल्याण करताना लोकांनी पाहिलं आहे. हा फरक राज्यातील जनता ओळखेल आणि या निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळताना आपल्याला पाहायला मिळेल"

प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर (ETV Bharat Reporter)

काँग्रेसची नाराजी आमच्यासाठी फायद्याची: कोल्हापूर येथे काँग्रेसमध्ये झालेल्या वादाच्याबाबत दरेकर म्हणाले, "अनेक ठिकाणी काँग्रेसमध्ये बंड पाहायला मिळत आहे. राज्यात काँग्रेस पक्ष विस्कळीत झाला आहे. त्यांना विचारधाराच राहिलेली नाही. म्हणून छत्रपती घराण्यातील सुनेचा अपमान कश्या पद्धतीनं केला आणि कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसचा हातच गायब झाला. यावरून राज्यातील जनतेचं काँग्रेसबाबतचं काय मत झालं आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यांच्यामधील नाराजी ही आमच्यासाठी फायद्याची ठरणार".


एकमेकांच्या विरोधात काम :आज मुंबईत महाविकास आघाडीची राहुल गांधी, शरद पवारांची एकत्रित सभा होत आहे. याबाबत दरेकर म्हणाले, "ते शरीरानं एकमेकांच्या बाजूला जरी खुर्च्या लावून बसलेले असले तरी, मनानं ते वेगवेगळे आहेत. निवडणुकीत देखील एकमेकांच्या विरोधात काम करतील आणि याचा प्रत्यय निकाल आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल"

हेही वाचा -

  1. सायन-कोळीवाड्यातून तमील सेल्वन पुन्हा विजय मिळवण्याच्या तयारीत, नेमकी रणनीती काय?
  2. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घोषणापत्र प्रसिद्ध, 'लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार;' अजित पवारांचं आश्वासन
  3. "आहे आनंदाची दिवाळी, आता वेळ आहे महायुतीच्या सत्तेची पाळी", चारोळीतून आठवलेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details