महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

श्रीरामपूरमध्ये महायुतीत बिघाडी; माजी खासदार लोखंडे पितापुत्राने दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांच्या मुलानं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

Maharashtra Assembly Election 2024
सदाशिव लोखंडे चैत्यन लोखंडे उमेदवारी अर्ज दाखल करताना (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2024, 5:02 PM IST

शिर्डी: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून मुलगा प्रशांत लोखंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, पक्षानं माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिल्यानं ते नाराज झाले. अखेर मंगळवारी शेवटच्या दिवशी लोखंडे पिता पुत्रानं आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.


सदाशिव लोखंडे यांचा पराभव: शिवसेनेत असलेले सदाशिव लोखंडे यांनी दोन टम शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली होती. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले आणि 2024 चा लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला होता. पराभव झाल्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून मुलगा प्रशांत लोखंडेला उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे याच्याकडं मागणी केली होती.

अर्ज माघारी घेण्याची मुदत :नुकतेच शिवसेनेत शिंदेंच्याकडे गेलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिंदेंनी उमेदवारी दिली. नाराज झालेल्या लोखंडेनी पक्षाशी बंडखोरी करत आपल्या मुलासह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत असल्यानं पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या लोखंडे याचं मन वळवण्यात शिंदेंना यश येईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

प्रमुख उमेदवार :विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार मोनिका राजळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, शिवाजी कर्डिले, प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, राजेंद्र नागवडे, अमित भांगरे, हेमंत ओगले, भाऊसाहेब कांबळे, विठ्ठलराव लंघे, शंकरराव गडाख, आशुतोष काळे, प्रभावती घोगरे, रोहित पवार, राम शिंदे, किरण लहामटे, वैभव पिचड, संदीप वर्पे यांचा समावेश आहे.


श्रीरामपूरला बंडखोरी : शिवसेनेला श्रीरामपूरमध्ये फटका बसला असून माजी खासदार सदाशिव लोखंडे आणि त्यांचा मुलगा प्रशांत लोखंडे यांनी श्रीरामपूर मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.


नेवासा, श्रीरामपूरमध्ये महायुतीत बिघाडी: श्रीरामपूर मतदारसंघात काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानं शेवटच्या क्षणी लहू कानडे यांना महायुतीकडून उमेदवारी दिली. तर शिंदें शिवसेना उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाही उमेदवारी दिली. त्यामुळं येथून महायुतीकडून कानडे आणि कांबळे या दोघांनीही AB फॉर्म मिळाल्यानं अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं महायुतीचा नेमका उमेदवार कोण असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

महायुतीचा नेमका उमेदवार कोण : नेवासा मतदारसंघातून शिवसेनेनं विठ्ठलराव लंघे यांना तर राष्ट्रवादीनं अब्दुल शेख यांना उमेदवारी दिली. दोघांना AB फॉर्म मिळाल्यानं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं महायुतीचा नेमका उमेदवार कोण? असा सवाल मतदार करत आहेत. खरं चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दि. 4 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत हा संभ्रम कायम राहणार आहे.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय घराण्यांचाच बोलबाला; राजकीय घराणेशाहीतील उमेदवारांची यादी एका क्लिकवर
  2. भाजपाकडून महायुतीमधील राष्ट्रवादीसह शिवसेनेला संपवण्यात आले-रमेश चेन्नीथला
  3. अजित पवार आणि फडणवीसांवर राज्यपालांनी गुन्हा नोंदवावा - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details