पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR HEALTH UPDATE) हे रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शुक्रवारी (1 नोव्हेंबर) अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी या दोन्ही शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून वैद्यकीय तज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तर असं असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांचा रुग्णालयातील एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती दिलीय. तसंच यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलंय.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? : प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मी सध्या आयसीयूमध्ये असून अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी या दोन्ही शस्त्रक्रिया झाल्यात. डॉक्टरांनी निरीक्षणाखाली ठेवलंय. निवडणुकीला देखील सुरुवात झाली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. ओबीसींसाठी सुद्धा महत्वाची आहे. कारण, विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार आहे. तर एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार आहे. "