नवी दिल्ली PM Narendra Modi : "मी हेडलाईनवर नाही, तर डेडलाइनवर काम करणारा व्यक्ती आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. माझी नजर 2029 च्या निवडणुकांवर नाही, तर 2047 च्या भारतावर आहे. मी 2047 ची तयारी करत असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी : या कार्यक्रमात भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, "देशातील ज्या गावांना शेवटचं गाव म्हटलं जात होतं, मी त्या गावांना पहिलं गाव म्हटलंय. जर ते पूर्वेकडे असतील तर सूर्याची पहिली किरणं तिथं येतात. जर ती पश्चिम भागात असतील तर मग ते शेवटची गावे आहेत. मी श्रीमंतांची गरिबी पाहिली आहे. गरिबांची श्रीमंतीही पाहिलीय." पुढं बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "ही निवडणूकीची वेळ आहे. आमच्या विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांनीही कागदावर स्वप्ने दाखवण्याची भाषा केलीय. मोदी सरकार निश्चयानं स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. मी खात्रीनं सांगू शकतो की आगामी पाच वर्षे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल. येत्या पाच वर्षात भारताच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळेल. येत्या पाच वर्षात तुम्हाला भारताच्या संरक्षण क्षेत्रात यशाचा नवीन टप्पा दिसणार आहे. येत्या पाच वर्षात तुम्हाला भारताची सेमीकंडक्टर क्षेत्रात क्रांती दिसेल. हे संकल्प साध्य करण्याचं उद्दिष्ट आहे. मी यासाठी खूप पूर्वीपासून काम केलंय."