मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आाचारसंहिता भंग केल्याचा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केलाय. निवडणुकीच्या तोंडावरती महिलांची दिशाभूल करणारी विधानं करण्यामध्ये मविआच्या नेत्यांची मोठी स्पर्धा चालली आहे, असं त्यांनी सांगितलंय.
सोनिया गांधी यांनी केला आचारसंहिता भंग :"काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर केलं की, महिलांना एक लाख रुपये देऊन ‘महालक्ष्मी’ नावाची योजना सुरू करणार. म्हणजेच बाजारात तुरी अजून आहे त्याच्या आधीच महिलांना कुठेतरी आश्वासन फक्त देऊन सांगायचं, ते सुद्धा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान चालू असताना, अशी गोष्ट करायची म्हणजे सरळ सरळ आचारसंहितेचा भंग आहे. आतापर्यंत बचत गटांना कमी व्याजामध्ये कर्ज मिळवून द्या, हे वारंवार सांगून सुद्धा केंद्र सरकारनं केलं नव्हतं, याउलट केंद्र सरकारचं नवीन आलेलं महिला धोरण, स्त्री केंद्री बजेट महिलांना विधानसभा, लोकसभेत आरक्षण असे अनेक निर्णय अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर मोदी सरकारनं केले आहेत. त्यामुळं महिलांची दिशाभूल करणारा सोनिया गांधी यांचं आश्वासन आहे."