महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही...", हसन मुश्रीफांना समरजित घाटगेंचं प्रत्युत्तर - Samarjeet Ghatge On Hasan Mushrif

Samarjeet Ghatge On Hasan Mushrif : समरजित घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ज्या व्यक्तीनं तुम्हाला सर्व पदं दिली, तेव्हा त्यांना अल्पसंख्याक म्हणून विषय नव्हता का? असा सवाल समरजित घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना केलाय.

Samarjeet Ghatge On Hasan Mushrif
समरजित घाटगे, शरद पवार (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2024, 6:53 PM IST

Updated : Sep 4, 2024, 7:19 PM IST

कोल्हापूर Samarjeet Ghatge On Hasan Mushrif : भाजपा नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पवार गटात प्रवेश केला. कागलच्या गैबी चौकात समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. आता शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी "पवार साहेब से बैर नहीं, मगर समरजीत अब तुम्हारी खैर नही" असा इशारा दिला. त्यामुळं कागलच्या राजकारणावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी-काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांच्यात कलगी तुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

समरजीत घाटगे यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या इशार्‍यानंतर समरजीत घाटगे यांनी प्रत्युत्तर दिलंय. "हसन मुश्रीफांनी याआधीही अशा धमक्या दिल्या आहेत, मी त्यांच्या गोष्टींना फारसं सिरीयस घेत नाही. मात्र ज्या नेत्यांनी तुम्हाला मोठं केलं, पदं दिली त्या शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळं महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही," असा हल्लाबोल समरजीत घाटगे यांनी केला.

हसन मुश्रीफ यांनी घोर पाप केलंय :मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी "मी अल्पसंख्याक आहे म्हणून शरद पवार माझ्या मागे लागले आहेत," असा आरोप केला. त्यांच्या या आरोपाला समरजीत घाटगे यांनी उत्तर दिलंय. "ज्या व्यक्तीनं तुम्हाला सर्व पदं दिली तेव्हा त्यांना अल्पसंख्याक म्हणून विषय नव्हता का? असा सवाल घाटगे यांनी उपस्थित केला. "हसन मुश्रीफ मला काय बोलतात ते बोलू द्या, पण पवार साहेबांना उद्देशून केलेल्या त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांच्यावर असले आरोप करायचं धाडस कुणीही करत नाही ते तुम्ही केलं, तुम्ही घोर पाप केलंय. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. मला काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही शरद पवारांची जाहीर माफी मागावी," असा हल्लाबोल समरजीत घाटगे यांनी केलाय.

राजाविरुद्ध प्रजा मग 2009 ला काय होतं :मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना कागलची येणारी विधानसभा राजाविरुद्ध प्रजा होणार असल्याचं म्हटलं याला प्रत्युत्तर देताना समरजीत घाटगे म्हणाले, तुम्ही राजाविरुद्ध प्रजा असं म्हणत असाल तर 2009 ला संभाजी राजे छत्रपती देखील लोकसभेला उभे राहिले होते. जर तुम्ही तसं म्हणत असाल तर 2009 ला ठरवून संभाजी राजे छत्रपती यांचा पराभव केला का? असा सवाल समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना केला.

हेही वाचा

  1. शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागत नाही, मग गृहखाते काय करते? संजय राऊतांचा सवाल - Sanjay Raut News
  2. महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदी कोण होणार? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य - Sharad Pawar News
  3. भाजपाच्या लाडक्या उद्योगपतीकडून शिवरायांच्या पुतळ्याची मुंबईत विटंबना-संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut today news
Last Updated : Sep 4, 2024, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details