महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

नागपुरात नितीन गडकरींविरोधात ठाकरे काँग्रेसचा 'विकास' करणार का? - Nagpur Lok Sabha Constituency - NAGPUR LOK SABHA CONSTITUENCY

Nagpur Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी तिकीट देण्यात आलंय. यामुळं आता भाजपाचे नितीन गडकरी यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे.

नागपूरात नितीन गडकरींविरोधात ठाकरे काँग्रेसचा 'विकास' करणार का?
नागपूरात नितीन गडकरींविरोधात ठाकरे काँग्रेसचा 'विकास' करणार का?

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 10:52 AM IST

Updated : Mar 24, 2024, 1:36 PM IST

नागपूर Nagpur Lok Sabha Constituency : नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार विकास ठाकरे विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यात थेट सामना होणार असल्याचं स्पष्ट झालंय. काँग्रेस पक्षाकडून आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालंय. काँग्रेस पक्षानं नितीन गडकरींच्या विरोधात लढवण्याची जबाबदारी आमदार विकास ठाकरे यांच्याकडे सोपवलीय. "पक्षानं माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळं मी या लढाईसाठी पूर्णपणे तयार आहे," असे विकास ठाकरे यांनी म्हटलय. तर काँग्रेसनं विकास ठाकरे यांचा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया भाजपाकडून येत आहे.

पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणार :कॉंग्रेसनं शनिवारी रात्री उशिरा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील चार उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नागपुरातून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे, भंडारा-गोंदियातून प्रशांत पडोळे व गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विकास ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले, "काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून हे आव्हान स्वीकारलंय. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. नागपूर लोकसभा मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत. त्या आधारावर मी निवडणूक लढणार आहे. काँग्रेस पक्षानं मला बरंच काही दिलं. त्यामुळं पक्षानं जी जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार आहे."

कोण आहेत विकास ठाकरे : विकास ठाकरे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये ते काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातुन निवडून आले होते. त्यांचं शिक्षण बी. कॉमपर्यंत झालंय. 1985 पासून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. 1988 नागपूर शहर एनएसयुआय महासचिव झाले. त्यांनतर 1990 ला नागपूर शहर युवक काँग्रेस महासचिव झाले. तर 1998 मध्ये विदर्भ युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. 2001 मध्ये नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महासचिव झाले. 2002 मध्ये ते नागपूर महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. तसंच 2002 ते 2005 दरम्यान ते नागपूर शहराचे महापौरदेखील होते. पुढं 2012 ते 2017 या कालावधीत त्यांनी नागपूर मनपाचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलंय. त्यांचं काम पाहून कॉंग्रस पक्षानं त्यांना 2019 मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांनी नागपूर पश्चिम विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला.

12 वेळा नागपूरात काँग्रेसचा विजय : नागपूर लोकसभेत आतापर्यंत 12 वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाय. केवळ तीन वेळा भारतीय जनता पक्षाचे उमेदवारानं इथं निवडणूक जिंकलीय. नागपूरची जनता यावेळी सुद्धा काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.

विकास ठाकरेंचा राजकीय बळी : "विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी विरोधात निवडणूक लढण्यापूर्वी हार मानलीय. त्याच कारण म्हणजे पक्षात वरिष्ठ नेते लढण्यास तयार नाहीत. त्यामुळे आमदार विकास ठाकरेंना निवडणूक लढविण्याची गळ घालण्यात आली," अशी टीका भाजपा नेते धर्मपाल मेश्राम यांनी केली.

हेही वाचा :

  1. काँग्रेसच्या चौथ्या यादीत राज्यातील 'या' चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा; गडकरींविरोधात विद्यमान आमदाराला तिकीट - Lok Sabha Elections 2024
  2. कल्याणचा सुभेदार कोण? मुख्यमंत्री शिंदे पुत्र की दिवंगत आनंद दिघेंचा पुतण्या? - Kedar Dighe VS Shrikant Shinde
Last Updated : Mar 24, 2024, 1:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details