महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

'मर्यादा पुरुषोत्तम राम' म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी काढली सुषमा स्वराज यांची आठवण - Sushma Swaraj

Supriya Sule On Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरुन विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केलीय. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केलंय.

Supriya Sule News
सुप्रिया सुळे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 5:35 PM IST

कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे

पुणे Supriya Sule On Ayodhya Ram Mandir : खासदार सुप्रिया सुळे रविवारी पुणे दौऱ्यावर होत्या. मतदार संघातील अनेक ठिकाणी भेट देत सुप्रिया सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱयांना इशारा दिलाय. माझे वडील फार कमी बोलतात. ते कुणाला सल्ला तर देतच नाहीत. आता माझ्या वडिलांच्या मागे त्यांची बदनामी करायला अदृश्य शक्ती लागली आहे. राजकारण जरूर करा पण असं करू नका, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुषमा स्वराज यांची काढली आठवण :अयोध्या येथे सोमवारी (22 जानेवारी) प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी सर्वत्र उत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 'जय श्रीरामा'च्या घोषणांनी देश दुमदुमून गेलाय. राम मंदिरावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण काढली. आज जय श्रीराम बोललं जात आहे. पण सुषमा स्वराज या नेहमी 'मर्यादा पुरुषोत्तम राम' असं म्हणत होत्या. आज हे 'जय श्रीराम' म्हणत आहेत, म्हणा आमचं काहीही म्हणणं नाही. पण आपण 'मर्यादा पुरुषोत्तम राम' म्हणायचं. मर्यादेचं राजकारण आणि समाजकारण करू, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

संघर्षाला घाबरत नाही : 'सत्तेत असेल किंवा नसेल, पण तुमची ही लेक संघर्ष करत राहणार आहे. ती संघर्षाला घाबरत नाही. काय संघर्ष आहे हे तुम्ही दररोज बघत आहात. सध्या राज्यातील राजकारण गलिच्छ स्वरूपाचं झालं आहे. मी सुशिक्षित असून कुठल्याही कंपनीत काम केलं असतं तर आज सीईओ झाले असते. दर शनिवार, रविवारी इथं आले नसते', असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

अदृश्य शक्ती महाराष्ट्र चालवत आहे : माझे वडील खूप कमी बोलतात. ते फार सल्ला द्यायला जात नाहीत. आज त्यांची बदनामी करायला अदृश्य शक्ती मागे लागली आहे. कोणती अदृश्य शक्ती आहे हे मला माहिती नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, अदृश्य शक्ती महाराष्ट्र चालवत आहे. मी सायन्सची विद्यार्थी असल्यानं ती कोणती शक्ती आहे हे मला माहिती नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. रोहित पवार यांना आलेल्या ईडी नोटीसवर सुळे म्हणाल्या, आमच्या रोहितला ईडीची नोटीस आली आहे. तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? सत्ता ही नागरिकांसाठी असते. माझ्या मागे जर अदृश्य शक्ती असती तर मी म्हटलं असतं की, 'गॅसचे दर कमी करा'.

हेही वाचा -

  1. पिंपरी चिंचवड येथे भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन; हजारो मुलांनी चित्रकलेतून साकारले प्रभू श्रीराम
  2. नागपुरात 'एक धागा रामासाठी' उपक्रम; विणकरांनी घेतला पुढाकार
  3. इंग्रजांच्या चलनावर होते प्रभू रामचंद्रांचा दरबार, शहरातील कुटुंब करते रोज पूजन

ABOUT THE AUTHOR

...view details