महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"घरात घुसून मारल्याशिवाय..."; मनसेचा ठाकरे गटाला इशारा, जितेंद्र आव्हाड म्हणाले... - Uddhav Thackeray Convoy Attacked - UDDHAV THACKERAY CONVOY ATTACKED

Uddhav Thackeray Convoy Attacked : उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी ठाण्यात मनसैनिकांनी हल्ला केला. मनसैनिकांनी नारळ, शेण, बांगड्या ठाकरेंच्या गाडीवर फेकल्या. यावरुन आता राजकीय वातावरण तापलं आहे. यावरुन मनसे नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिलाय. तर ठाकरे गटानंही मनसेला प्रत्युत्तर दिलंय.

Avinash Jadhav On Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या वाहनांवर फेकले शेण (ETV Bharat MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 8:14 AM IST

ठाणे Uddhav Thackeray Convoy Attacked : बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या. याचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटले. उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी जात असताना त्यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण, नारळ, बांगड्याही फेकल्या. याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कोणतीही कारवाई केल्यास दगडफेकीनं प्रत्युत्तर देणार, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.

प्रतिक्रिया देताना मनसे नेते अविनाश जाधव (ETV Bharat Reporter)

मनसेचा इशारा : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या नारळ आणि शेणाच्या हल्ल्याची जबाबदारी अखेर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वीकारली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या काही शिवसैनिकांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे वाहन अडवून सुपाऱया फेकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून शनिवारी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी नारळ आणि शेण फेकलं. "बीड येथील घटनेला हे चोख उत्तर आहे. राज ठाकरे यांच्यावर कोणतीही कारवाई केल्यास दगडफेकीनं प्रत्युत्तर देवू," असा इशारा मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिला.

ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने :शनिवारी उद्धव ठाकरे ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये दाखल होताच महिला मनसैनिकांनी गोंधळ घालत त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकल्या होत्या. पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडला. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसैनिकांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंचं बॅनर देखील फाडण्यात आलं.

राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला 'सुपारीबाज' का म्हटलं जातं हे आता आम्हाला समजलं. झेड श्रेणीची सुरक्षा असूनही उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला झाला. उद्धव ठाकरे हे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांची सुरक्षा कशी करणार? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. - आनंद दुबे, नेते, शिवसेना - UBT

उद्धव ठाकरेंच्या गाडीवर झालेला प्राणघातक हल्ला यावरून स्पष्ट होतं की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखं वागावं. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे, त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. - जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी - SCP

मनसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय शांत बसणार नाही :या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, "तुम्ही सुपार्‍या मारल्या तर आम्ही नारळ मारणार. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील 16-17 गाड्यांवर मनसैनिकांनी नारळ फोडले. त्यामुळं कोणीही राज ठाकरेंच्या नादी लागू नये." "तसंच जर उद्या कोणत्या कार्यकर्त्यानं राज ठाकरेंविरोधात अपशब्द वापरले तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय मनसैनिक शांत बसणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.


हेही वाचा -

  1. उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत मनसैनिकांचा राडा; गाडीवर फेकल्या बांगड्या आणि शेण - Thackeray Group VS MNS
  2. जरांगेंच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण - राज ठाकरे यांचा गंभीर आरोप - Raj Thackeray
  3. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय यात्रांचं पेव - Maharashtra Assembly Elections

ABOUT THE AUTHOR

...view details