मुंबईUday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंत्री उदय सामंत यांना उच्च रक्त दाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती हॅास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे दाखल: मंत्री उदय सामंत यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, मंत्री उदय सामंत हे नुकतेच दावोस दौऱ्यावरून परतले होते. तसंच राज्यातील अनेक भागात ते दौरा करत असतात. सततच्या प्रवासामुळं त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं मंत्री सामंत यांना आज तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
सध्या प्रकृती स्थिर : मंत्री उदय सामंत यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली. तसेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून काळजी करण्याचं कोणतंच कारण नाही. सध्या मंत्री सामंत यांची प्रकृती स्थिर असल्याचं लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलंय. उपचारानंतर मंत्री सामंत यांना बरं वाटत असल्याचंही सांगितलं आहे. दावोस दौऱ्यावरून मंत्री उदय सामंत यांच्यावर मोठी टीका विरोधकांनी केली होती. तसंच दौरा खर्चाचे पुरावे विरोधकांनी मागितले होते.
45 हजार 700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार :17 जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सांमत हे स्वित्झर्लंड येथील दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेले होते. या बैठकीत महाराष्ट्राने आपला ठसा उमटवत विविध कंपन्यांसोबत सुमारे 45 हजार 700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे दहा हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता.
हेही वाचा -
- Maratha Protest : मराठा आंदोलकांनी अजित पवार, उदय सामंताचं बॅनर फाडलं
- नितीश कुमारांच्या वक्तव्यावर ठाकरे गप्प का, मंत्री उदय सामंत यांचा सवाल
- Uday Samant On Maratha Reservation : सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार - मंत्री उदय सामंत